सुरगाण्यात आदिवासींचा मोर्चा

By Admin | Updated: August 4, 2014 00:50 IST2014-08-03T20:51:20+5:302014-08-04T00:50:18+5:30

सुरगाण्यात आदिवासींचा मोर्चा

Survival Tribal Front | सुरगाण्यात आदिवासींचा मोर्चा

सुरगाण्यात आदिवासींचा मोर्चा

 

सुरगाणा : आदिवासी जमातीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये यासाठी आदिवासी समाज बचाव कृती समितीतर्फे तहसील कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो समाजबांधव, विद्यार्थी, आदिवासी सामाजिक संघटना, आदिवासी कर्मचारी संघटना, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चासाठी सर्वच आदिवासीबांधव मोठ्या संख्येने पोलीस परेड मैदानावर एकत्र जमले. घोषणा देत, हातात फलक घेत हा मोर्चा बसस्थानक, तेलीगल्ली मार्गे तहसील कार्यालयात पोहचला. या मोर्चाचे रूपांतर
तहसील कार्यालयाच्या आवारात सभेत झाले.
यावेळी माजी आमदार जिवा गावित, हेमंत वाघेरे, भिका राठोड, सुभाष चौधरी, उर्मिला गावित, सावळीराम पवार, रंजित गावित, समीर चव्हाण, पी. के. चव्हाण, आर. डी. भोये, जयराम गावित, राम चौरे, राजेश गावित, पंकज ठाकरे, तुळशिराम खोटरे, ज्ञानदेव पवार, आर. एच. गांगुर्डे, विद्यार्थी प्रतिनिधी परशराम बिरारी, माधुरी गवळी, डॉ. हिरामण गावित, धमेंद्र पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. या आरक्षण बचाव कृती समितीमध्ये आदिवासी कर्मचारी संघटना, विश्वास फ्रेंड सर्कल, हिंदुस्थानी कला व क्रीडा प्रसारक मंडळ सुरगाणा, युवा फेरडरेशन, स्टुडंट फेडरेशन शाखा सुरगाणा, आदिवासी हक्क संरक्षण समितीसह विविध आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात हिरामण गावित, वसंत बागुल, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश गवळी, मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर खंबायत, जयराम गावित, काशीनाथ गायकवाड, वसंत राठोड, गंगाराम गावित, राष्ट्रवादीचे सरचिटणीस भास्कर चौधरी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी एस. के. चौधरी, पांडुरंग पवार, प्रभाकर महाले, नामदेव चौधरी, सुधाकर भोयेसह सुमारे पाच हजारपेक्षा जास्त आदिवासीबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार रशिद तडवी यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चाचा अध्यक्षस्थानी उपसभापती इंद्रजित गावित होते, तर सूत्रसंचालन रतन चौधरी यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Survival Tribal Front