क्रेडाई नाशिकच्या अध्यक्षपदी सुनील कोतवाल

By Admin | Updated: April 2, 2016 00:02 IST2016-04-01T23:34:36+5:302016-04-02T00:02:21+5:30

क्रेडाई नाशिकच्या अध्यक्षपदी सुनील कोतवाल

Sunil Kotwal as president of CREDAI Nashik | क्रेडाई नाशिकच्या अध्यक्षपदी सुनील कोतवाल

क्रेडाई नाशिकच्या अध्यक्षपदी सुनील कोतवाल

नाशिक : कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया अर्थात ‘क्रेडाई’ नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी सुनील कोतवाल यांची सुर्वानुमते निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी दोन वर्षांसाठीच्या नूतन कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडीची घोषणादेखील यावेळी करण्यात आली.
कार्यकारणीत उपाध्यक्षपदी राजेंद्र ठक्कर, नरेश कारडा, मानद सचिव उमेश वानखेडे, सहसचिव उदय घुगे, कुणाल पाटील, सदस्य रवि महाजन, सुनील गवादे, अमित रोहमारे, हेमंत पारख, अनिल अहेर, समीर सोनवणे, प्रशात पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान, झालेल्या बैठकीत माजी अध्यक्ष जयेश ठक्कर व माजी मानद सचिव नरेश कारडा यांनी गेल्या दोन वर्षांतील आपल्या कार्यकालाचा आढावा सादर केला, तर नूतन अध्यक्ष कोतवाल यांनी पुढील दोन वर्षांत क्रेडाई नाशिकसाठी आपण काय काम करू इच्छितो याविषयीचे मनोगत व्यक्त केले. या बैठकीला के्रडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर, राजन दर्यानी, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुनील भायभंग, क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष नेमीचंद पोतदार, सदाशिव शुक्ल, विजय संकलेचा, किरण चव्हाण आदि उपस्थित होते.

Web Title: Sunil Kotwal as president of CREDAI Nashik