सुनील बागुल अखेर भाजपात

By Admin | Updated: October 14, 2014 01:22 IST2014-10-14T00:45:07+5:302014-10-14T01:22:21+5:30

सुनील बागुल अखेर भाजपात

Sunil Bagul is finally BJP | सुनील बागुल अखेर भाजपात

सुनील बागुल अखेर भाजपात

 

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकत सोमवारी (दि.१३) ओझर विमानतळावर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेले सुनील बागुल हे पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. मात्र कार्यकर्त्यांची व समर्थकांशी चर्चा करूनच आपण निर्णय घेऊ, असे त्यांचे म्हणणे होते. अखेर रविवारी (दि.१२) त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची ये-जा
वाढली.
रविवारी सायंकाळी सेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून पुन्हा स्वगृही येण्याची गळ घातल्याचे कळते, तर सोमवारी सकाळीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार वसंत गिते यांच्यासह महापौर अशोक मुर्तडक यांनी सुनील बागुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना मनसेत येण्याबाबत गळ घातल्याचे कळते. दुपारनंतर घडामोडी घडत चांदवड येथे सभेला आलेल्या भाजपाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र फडणवीस सभा आटोपून सायंकाळी सहा वाजता ओझर विमानतळावर आल्यावर फडणवीस यांच्या उपस्थितीत सुनील बागुल यांनी कार्यकर्ते व समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष विकास देशमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Sunil Bagul is finally BJP