शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तारांमुळे अडले रविवार कारंजा रस्त्याचे घोडे

By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST

नागरिकांचे हाल : पालिकेनेही केले हात वर; महावितरणकडे ताराच शिल्लक नाहीत

नाशिक : शहरातील महत्त्वाच्या अशा अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यानच्या रस्ता कॉँक्रिटीकरणाचे काम आता महावितरणमुळे खोळंबले आहे. विजेच्या तारा भूमिगत करण्यासाठी महावितरणकडे ताराच शिल्लक नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, रहदारीच्या या मार्गावरील नागरिकांना रस्त्याच्या अर्धवट कामामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, महापालिकेने त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.महापालिकेच्या वतीने कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण आणि काही भागात कॉँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्याच अंतर्गत अशोकस्तंभ ते रविवार पेठ दरम्यान कॉँक्रिटीकरणाचे काम तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता वाहता आहे. हा रस्ता बंद करून वाहतूक घारपुरे घाटाकडून वळविण्यात आल्याने आधीच गोंधळ होत आहे. त्यातच अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यान शेकडो नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापलीकडे जाऊन नाशिकचा घाऊक बाजार येथे असून तेल, तूप, गूळ, तांदळासह अन्य अनेक अन्न-धान्याची बाजारपेठ येथे आहे. रस्ता बंद असल्याने आणि अर्धवट कामामुळे त्यांना या रस्त्यावरून माल ने-आण करणे अडचणीचे ठरले आहे. तरीही शहरच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता असल्याने त्याचे काम चांगलेच व्हावे, यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तथापि, या रस्त्याचे काम रखडल्याने ते कधी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कॉँक्रिटीकरण केल्यानंतर ते काम दीर्घकाळ टिकते त्यामुळे रस्ता होण्याच्या आत गटारींची कामे, मलवाहिका टाकणे तसेच विजेच्या तारा भूमिगत करणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. तथापि, महावितरणचे काम रखडल्याने रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात या भागातील नागरिकांनी मंगळवारी खरवंदा पार्क येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनुले यांची भेट घेतली आणि वीज तारांचे काम का रखडले, अशी विचारणा केली, त्यावर त्यांनी महावितरणकडे या कामासाठी ताराच शिल्लक नाही आणि आता नवीन प्राकलन बनवावे लागेल, असे उत्तर दिल्याने नागरिक सर्द झाले आहेत. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)