शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

सुकन्या ठरल्या राजकीय वारस!

By admin | Updated: February 15, 2017 17:37 IST

राजकारणात सक्रिय नसताना चौघी रिंगणात

नाशिक : राजकारणात सामान्यत: मुलगा अथवा पुतण्याला वारस म्हणून पुढे केले जात असताना नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मात्र यंदा सहा राजकीय नेत्यांनी आपल्या मुलींना राजकीय वारस म्हणून रिंगणात उतरवले आहे. त्यात दोन मुलींना महापालिकेत कामकाज केल्याचा चांगला अनुभव असला तरी अन्य चौघी मात्र राजकारणात सक्रिय नसताना प्रथमच थेट आव्हान देऊन उभ्या राहिल्या आहेत.सामान्यत: राजकारणात असलेले पुरुष आपल्या मुलांना वारस म्हणून पुढे आणतात. राजकारणात मुली सक्षम असल्या तरी मुलांनाच पुढे केले जाते. परंतु महापालिकेत यापूर्वी काही प्रकरणात अपवादात्मक स्थितीतच मुलींना वारस म्हणून पुढे करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या नयना घोलप, माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया यांची कन्या कोमल मेहरोलिया तसेच माजी नगरसेवक भगवान भोगे यांनी त्यांची कन्या रिमा भोगे यांना पुढे केले होते. तिघींनी नगरसेवक पद भूषविले होते. नयना घोलप यांनी तर महापौरपद भूषविले असून, सध्याही त्या नगरसेवक आहेत. कोमल मेहरोलियादेखील विधी शिक्षण घेणारी युवती असून, त्याही नगरसेवक आहेत. आता पुन्हा शिवसेनेकडून नयना घोलप (प्रभाग २२) तर भाजपाकडून कोमल मेहरोलिया (प्रभाग २१) नशीब अजमावत आहेत. बबनराव घोलप यांची दुसरी कन्या तनुजा यांना गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले होते. परंतु आता महापालिका निवडणुकीत नशीब अजमावत असून प्रभाग २१ मधून त्या शिवसेनेकडून उमेदवारी करीत आहेत. याच प्रभागात रिपाइंचे नगरसेवक सुनील वाघ यांची कन्या नयनादेखील निवडणूक रिंगणात आहेत.