जेलरोडच्या प्रेमीयुगुलाची कसारा घाटात आत्महत्त्या

By Admin | Updated: February 28, 2015 23:52 IST2015-02-28T23:51:32+5:302015-02-28T23:52:29+5:30

जेलरोडच्या प्रेमीयुगुलाची कसारा घाटात आत्महत्त्या

Suicide of the lover of Jail Road | जेलरोडच्या प्रेमीयुगुलाची कसारा घाटात आत्महत्त्या

जेलरोडच्या प्रेमीयुगुलाची कसारा घाटात आत्महत्त्या

नाशिक : जुना कसारा घाटानजीक असलेल्या जंगलात प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. आत्महत्त्या करणारे दोघेही जेलरोड, नाशिकरोड येथील रहिवासी असल्याचे कसारा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या दोघांचीही ओळख पटली असून, मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले आहेत.
जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील लक्ष्मी केदारनगरी एकदंत अपार्टमेंटमध्ये राहणारा संतोष अनिल गाजरे (वय २१) हा शुक्रवार (दि. २० फेब्रुवारी) रोजी सायंकाळी ५ वाजता बेपत्ता झाला होता. त्याचे वडील अनिल रंगनाथ गाजरे यांनी २७ रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हरविल्याची फिर्याद दाखल केली होती, तर जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळील त्रिमूर्तीनगर येथे राहणारी प्रियंका शंकर काळे (वय १७) ही शुक्रवार (दि. २०) रोजी सायंकाळी घरातून बेपत्ता झाली होती.
प्रियंकाचा पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये बारावीचा पहिला पेपर होता. तिच्या घरच्यांनी शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी नातेवाईक, मैत्रिणी व पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये परीक्षेच्या ठिकाणी जाऊन शोधाशोध केली; परंतु प्रियंका कुठेही सापडली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघांच्या त्यांच्या नातेवाइकांकडून शोध सुरू असतानाच कसारा घाटात त्यांनी आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले. मृतदेहांची ओळख पटली असून, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Suicide of the lover of Jail Road