जेलरोडला युवकाची गळफास घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 01:47 IST2022-05-27T01:47:01+5:302022-05-27T01:47:19+5:30
जेलरोडच्या मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

जेलरोडला युवकाची गळफास घेत आत्महत्या
नाशिकरोड : जेलरोडच्या मॉडेल कॉलनी येथे राहणाऱ्या युवकाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मॉडेल कॉलनीतील वसंत विहार सोसायटीत राहणारा अमोल अशोक देशमुख हा सोमवारी रात्री आपल्या भावाच्या घरी जेवण करून पुन्हा त्याच्या घरी आला होता. अमोल व त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू असल्याने सहा महिन्यांपासून त्याची पत्नी माहेरी निघून गेल्याने तो एकटाच राहत होता. मंगळवारी अमोल भावाच्या घरी जेवायला आला नाही म्हणून त्याचा भाऊ नीलेश देशमुख मंगळवारी रात्री त्याच्या घरी गेला. परंतु, अमोलचा मोबाइल बंद होता. आवाज देऊन प्रतिसाद मिळत नव्हता. नीलेशने नातेवाईक व पोलिसांना बोलावले. घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अमोलने बेडरूमच्या छताच्या हुकाला दोरी बांधून आत्महत्या केल्याचे आढळले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.