सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

By Admin | Updated: September 29, 2016 01:00 IST2016-09-29T00:59:24+5:302016-09-29T01:00:03+5:30

डेंग्यूसंदर्भात नगरसेवक संतप्त : आरोग्याधिकाऱ्यांना मूळ सेवेत पाठविण्याची मागणी

Submit criminal cases of malicious human rights | सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

नाशिक : शहरात डेंग्यूचा उद्रेक होऊ लागल्याने संतप्त झालेल्या महापालिका पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागावर आगपाखड केली. डेंग्यूमुळे अनेक जण दगावत असून स्वच्छता तसेच डास निर्मूलनाचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तर आरोग्याधिकारी योग्य रीतीने जबाबदारी पार पडत नसल्याने त्यांना मूळ सेवेत पाठविण्याची मागणी करण्यात आली.
डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या पार्श्वभूमीवर महापौर अशोक मुर्तडक यांनी आरोग्य विभागाची बैठक बोलवली होती. यावेळी आरोग्य विभागावर कामकाजात दिरंगाईचे खापर फोडण्यात आले.
शेजारील बंद फ्लॅटमध्ये आढळले डेंग्यू डास
नाशिक : नगरसेवक मेघा साळवे यांच्या फ्लॅटशेजारीच असलेल्या बंद फ्लॅटमध्ये डेंग्यू डासांची निर्मिती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच साळवे यांच्या मुलाला डेंग्यू झाल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच नगरसेवक मेघा साळवे यांच्या नऊ वर्षाच्या मुलाला डेंग्यू झाल्याने नगरसेवक संतप्त झाले. त्यावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात जाऊन तपासणी केली असता साळवे या इमारतीत राहतात, त्यांच्या शेजारील सदनिका दोन वर्षांपासून बंद असून त्याची तपासणी केली असता, इमारतीत शौचालयाचा फ्लश टॅँक, फ्रीजच्या पाठीमागील जागेत साचलेल्या पाण्यावर डेंग्यू डासांची उत्पत्ती स्थाने असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महापौर अशोक मुर्तडक यांनी बोलविलेल्या बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यामुळे शहरात बंदिस्त घरांचीदेखील शक्य असेल तर तपासणी करा, अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत.

Web Title: Submit criminal cases of malicious human rights