चोरीछुपे गुटखाविक्री अजूनही सुरूच

By Admin | Updated: September 5, 2014 00:33 IST2014-09-04T21:58:45+5:302014-09-05T00:33:22+5:30

चोरीछुपे गुटखाविक्री अजूनही सुरूच

The stunts are still going on | चोरीछुपे गुटखाविक्री अजूनही सुरूच

चोरीछुपे गुटखाविक्री अजूनही सुरूच


नाशिक : गुटखा विक्रीला बंदी असली तरीही शहरात अजूनही कागदाच्या पुडीतून गुटख्याची विक्री सुरूच आहे. कोणत्याही दुकानातून गुटख्याची मागणी केल्यास विक्रेते कागदी पुडीत बांधून गुटखा विकत असल्याचा फंडा समोर आला आहे. गुटखा विक्रीचे प्रकार कुणाला आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले असले तरीही तक्रारींचा ओघ नसल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. दुसरी बाब म्हणजे शहरात अनेक ठिकाणी चोरीछुपे पद्धतीने सुगंधित सुपारी आणि गुटख्याची विक्री होत असल्याचा संशय असतानाच ग्रामीण भागात सर्रास गुटखा विकला जात आहे, मात्र त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचेच दिसून येते. याप्रकरणी कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: The stunts are still going on