शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण उपसंचालक कार्यालयात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: September 27, 2016 01:13 IST

निवेदन सादर : शैक्षणिक शुल्क परत करण्याची मागणी

नाशिकरोड : शहर-जिल्ह्यातील महाविद्यालयांनी गेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडून घेतलेली अतिरिक्त फी विद्यार्थ्यांना पुन्हा परत करावी या मागणीसाठी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन केले. शहर-जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून गेल्या शैक्षणिक वर्षात अतिरिक्त फी वसूल केली होती. अतिरिक्त घेतलेली फी विद्यार्थ्यांना परत करावी म्हणून छात्रभारती संघटनेकडून वारंवार निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गेल्या वर्षी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची घेतलेली अतिरिक्त फी परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र दोन-तीन महाविद्यालयांनी काही विद्यार्थ्यांनाच थोडीशी फीची रक्कम परत केली होती.शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी १२.३० वाजता शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या दालनात छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष राकेश पवार व शहराध्यक्ष विशाल रणमाळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. जाधव हे बैठकीनिमित्त नाशिकला असल्याने सहायक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना निवेदन देण्याची सूचना केली. तसेच त्वरित योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे स्वत: येऊन चर्चा करणार नाही व कारवाईचे लेखी आदेश देणार नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी देखील शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली होती. मात्र छात्रभारतीचे कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव हे दुपारी २.३० च्या सुमारास आपल्या दालनात आल्यानंतर त्यांनी छात्रभारतीचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. जाधव यांनी कारवाईचे लेखी आदेश देऊन या शैक्षणिक वर्षाच्या चौकशीकरिता समिती नेमण्याचे जाहीर केल्यानंतर दुपारी ३.३० वाजता विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.ठिय्या आंदोलनात रोशन वाघ, समाधान बागुल, प्रवीण जाधव, मनिष गायकवाड, संतोष गोसावी, पियुष शिंदे, सचिन भुसारे, राम सुर्यवंशी, वैष्णवी पाटील, मंदा शिंदे, कोमल गांगुर्डे, स्वाती पाटील, अश्विनी सूर्यवंशी आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)