शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

गावठी बॉम्ब ठेवणाऱ्या विद्यार्थ्यास अटक

By admin | Updated: February 27, 2015 23:11 IST

इंटरनेटवरून बॉम्ब तयार करण्याची कल्पना

नाशिक : शरणपूर रोडवरील ‘सुयोजित हाईट’ या इमारतीतील बांधकाम व्यावसायिक अनंत राजेगावकर यांच्या कार्यालयात गावठी बॉम्बचे पार्सल ठेवणाऱ्या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी अटक केली आहे़ इंटरनेटवरून माहिती घेऊन त्याने गावठी बॉम्ब तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याचा दहशत निर्माण करून खंडणी उकळण्याचा त्याचा डाव होता, परंतु तो फसला असे पोलिसांनी सांगितले.महापालिकेच्या राजीव गांधी भवन समोर असलेल्या सुयोजित हाईटमध्ये अनंत राजेगावकर या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात बुधवारी (दि.२५) दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका युवकाने पार्सल दिले होते. त्यात गावठी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली होेती. पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने हा बॉम्ब निकामी केल्याने दुर्घटना टळली.   त्यानंतर पोलिसांनी राजेगावकर यांच्या कार्यालय व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच पार्सल राजेगावकर याांनाच उघडू द्या, असे बजावणाऱ्या कार्यालयात आलेल्या दूरध्वनी क्र मांकाची चौकशी केली आणि त्याच आधारे गुरूवारी दुपारी (दि. २६) संशयित महाविद्यालयीन युवकाला ताब्यात घेण्यात यश आले.हा संशयित मुलगा सधन कुटुंबातील आहे. त्याचे वडीलही बांधकाम क्षेत्रातील असून, पैसे मिळविण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ या युवकाने मोबाइल इंटरनेटवरून बॉम्ब बनविण्याची माहिती घेऊन त्यानुसार साहित्य गोळा केले़ यानंतर अंबड येथील त्याच्या मित्राच्या रिकाम्या घरात हा तयार केला. विशेष म्हणजे त्यासंदर्भात त्याच्या मित्रालाही काहीच माहिती नव्हती. बॉम्ब तया केल्यानंतर त्याने स्वत:च्या प्लेझर दुचाकीवरून बॉम्बचे पार्सल राजेगावकर यांच्या कार्यालयात ठेवून दिले व मोबाइलवरून कार्यालयात फोन करून हा बॉक्स राजेगावकरांनाच देण्याची सूचनाही केली़ याद्वारे दहशत निर्माण करून पैसे मागण्याचा त्याचा डाव होता, मात्र किती पैसे मागायचे हे अद्याप त्याने ठरविले नसल्याची माहितीही पोलीसांनी दिली. याविद्यार्थ्याने अंबड येथील त्याच्या मित्राच्या ज्या रिकाम्या घरात हा बॉम्ब तयार केला़, त्या घरातून इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. त्याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वाढवण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त बारगळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांच्यासह भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सायबर क्र ाईमचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, रघुनाथ शेगर, गोसावी, पोलीस उपनिरीक्षक उबाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)—कोट—दहशतीनंतर पैसे उकळण्याचा डावबॉम्ब तयार करणाऱ्या विद्यार्थ्याने ‘जस्ट डायल’ वरून नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांची माहिती आणि दुरध्वनी क्रमांक घेतले. इंटरनेटवर सुयोजित बिल्डकॉनचे नाव जास्त आल्याने त्याचीच निवड करून कार्यालयात बॉम्ब ठेवण्याची योजना तयार केली़ बॉम्ब ठेवण्याआधी एकदा सुयोजित कार्यालय व परिसराची पाहणीही करून बुधवारी (दि.२५) दुपारी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली़ यानंतर स्वत:च्याच मोबाइलवरून कार्यालयात फोन करून बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. तथापि, बॉम्ब निकामी झाला आणि तोही पकडला गेल्याने साराच प्लॅन फसला.