‘जिद्दीची कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी’

By Admin | Updated: July 19, 2014 01:06 IST2014-07-18T23:47:16+5:302014-07-19T01:06:28+5:30

‘जिद्दीची कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी’

'Stubborn Story Inspirational Women' | ‘जिद्दीची कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी’

‘जिद्दीची कहाणी महिलांसाठी प्रेरणादायी’

नाशिक : एचआयव्हीसारख्या असाध्य रोगावर मात करत जीवन आनंदी करणाऱ्या महिलांच्या जिद्दीची कहाणी तेजस्विनी पुस्तकात मांडलेली आहे़ ही जिद्द मानसिकरीत्या खचलेल्या सर्वच महिलांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक ठरेल, असे मत नॅबचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी येथे व्यक्त केले़
नक्षत्र लॉन्स येथे डा़ॅ सुलभा पवार लिखित तेजस्विनी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते़ पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कार्यकर्ते कुसुम व पी़ डी़ अहेर, दिग्दर्शक दत्ता पाटील व उपस्थितांच्या हस्ते झाले़
मुनशेट्टीवार म्हणाले, लेखिका डॉक्टर असल्याने त्यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांचा संपर्क आलेल्या महिलांचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला आहे़ यावरच न थांबता त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, स्त्री जीवनाचे विविध पैलू व त्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा हे मांडून समाजाच्या डोळ्यात अंजन घातले आहे़ याबरोबरच आजाराचा मागोवा घेत समाजजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे़
डॉ़ पवार म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात काम करताना या क्षेत्राबद्दलच्या नागरिकांच्या अपेक्षा, समाजाच्या दृष्टिकोन व प्रत्यक्ष आलेला अनुभव यातूनच ही कादंबरी मी पूर्ण करू शकले़ स्त्री जीवनाला अनादि काळापासून दुय्यम स्थान मिळाले आहे़ अशातच काही रोगांना सामोरे जाण्याची वेळ आल्यानंतर तिच्या वाट्याला येणारी उपेक्षा व समाजासह कुटुंबाचा बदललेला दृष्टिकोण याचे भयानक अनुभव आले, हे सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 'Stubborn Story Inspirational Women'