शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा रास्ता रोको

By admin | Updated: August 3, 2014 00:42 IST

प्रश्न आरक्षणाचा : डफ मोर्चाने दणाणले शहर; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : डफांचा कडकडाट, सोबत टिपेला पोहोचलेला झांजेचा आवाज, धनगरी नृत्य, भंडाऱ्याची उधळण आणि यळकोट यळकोट, जय मल्हार अशा वातावरणात धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आयोजित डफ मोर्चाने नाशिक दणाणले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून या मोर्चास प्रारंभ झाला़ त्र्यंबक नाका, जिल्हा परिषदमार्गे, शालिमार चौक, रेडक्रॉस चौक, महात्मा गांधी रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला़ मोर्चेकऱ्यांनी सुमारे सव्वादोन तास रस्त्यावरच ठाण मांडल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली़ त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले़ ब्रिटिशांनी धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला होता़ राज्यघटनेतही याच जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश आहे़ राज्य शासनाने इतर आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली आहे़ धनगर व धनगड हे एकच आहे़ परंतु शब्दांमध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचे आरोप करत या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ मोर्चात जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीचे भाऊलाल तांबडे, अ‍ॅड़ गंगाधर बिडगर, राजेंद्र खेमनार, शिवाजी ढेपले, साईनाथ गिडगे, बापू शिंदे, खंडेराव पाटील, धनंजय बुचडे, मच्छिंद्र बिडगर, पप्पू माने, मधुकर नंदाळे, आदिंसह धनगर बांधव सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)