शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरला इंधन दरवाढ विरोधात रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:51 IST

विंचूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील येथील तीन पाटी भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

विंचूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील येथील तीन पाटी भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास रास्ता रोको झाल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती.  पेट्रोलचे भाव शंभरीकडे गेले. घरगुती गॅस महागले असून, सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. डॉलरचे भाव कमी झाले असले तरी पेट्रोलचे भाव मात्र गगनाला पोहोचले असून, याचा निषेध म्हणून सरकारला जाब विचारण्यासाठी रास्ता रोको करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी सांगितले. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ झाली आहे. केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचविणारी असून, इंधन दरवाढीवर केंद्राचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याने केंद्र शासन गरीब, शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याची टीका तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे यांनी केली. मुंबई कृ.उ.बा समितीचे संचालक जयदत्त होळकर, युवानेते रणजित गुंजाळ यांसह पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. केंद्र शासनाने इंधन दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल,अशा आशयाचे निवेदन प्रशासनाच्या वतीने तलाठी शिर्के यांनी स्वीकारले.आंदोलनात दत्तात्रय डुकरे, बाळासाहेब लोखंडे, भाऊसाहेब भवर, राजेंद्र बोरगुडे, पांडुरंग राऊत, विलास गोरे, सचिन दरेकर, नानासाहेब जेऊघाले, रणजित गुंजाळ, आत्माराम दरेकर, ललित दरेकर, बबनराव शिंदे, सोहेल मोमीन, इस्माईल मोमीन, महेंद्र पुंड, जयंत साळी, अनिल विंचूरकर, ज्ञानेश्वर शेवाळे, किरण भोसले, मोसीन शेख,अविनाश सालगुडे, संतोष राजोळे सहभागी झाले होते. लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Nashikनाशिक