शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर रास्ता रोको

By admin | Updated: January 30, 2016 23:50 IST

गुंजाळबाबानगर चौफुली : सर्वपक्षीय आंदोलनात गतिरोधक, दुभाजकाची मागणी; तासभर वाहतूक ठप्प

पंचवटी : पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या ५३ वर्षीय महिलेला भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षियांनी या अपघातीस्थळाकडे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.दिंडोरी रोडवरील तारवालानगर ते अमृतधाम चौफुलीला जोडणाऱ्या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने या रस्त्यावर दुभाजक, तसेच गतिरोधक टाकावेत, अशी मागणी होत आहे. त्यातच शनिवारी पहाटे ६ वाजता हा अपघात घडला. या अपघातात लामखेडे मळा येथे राहणाऱ्या आशा शांताराम क्षीरसागर यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. आशा क्षीरसागर या नेहेमीप्रमाणे शनिवारी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी तारवालानगर चौफुली ते गुंजाळबाबानगर रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने (एमएच १५ डीएम ४८४३) जबर धडक दिली. यात क्षीरसागर यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर स्कॉर्पिओचालक फरार झाला होता. मात्र, काही वेळानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या अपघातप्रकरणी क्षीरसागर यांचा मुलगा मयूर क्षीरसागर याने दिलेल्या तक्रारीनुसार स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसे, भाजपा व शिवसेना अशा सर्वपक्षीय सदस्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन मनपा प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला. पंचवटी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक रुची कुंभारकर, भाजपाचे धनंजय माने, शिवसेनेचे महेंद्र बडवे आदिंसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी गुंजाळबाबानगर चौफुलीवर हे आंदोलन केले. तासभर आंदोलन करूनही महापालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट न दिल्याने संतप्त सर्वपक्षीय सदस्यांनी रस्त्यावरून न उठण्याची भूमिका घेतल्याने अखेर पंचवटी पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांना मनपात चर्चेसाठी नेल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनात संतोष शिंदे, नंदू शिंदे, भाऊसाहेब लामखेडे, दीपक डोळस, रवि गायकवाड, प्रमोद मंडलिक, राजू जेऊघाले आदिंसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)