शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:03 IST

अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.तालुक्यातील अनेक गावामधील नागरिकांनी वीज बिल भरणा केलेला आहे. तसेच नागरिक नियमितपणे बिले भरत आहेत. त्या लोकांवर एक प्रकारे महावितरण कंपनीकडून अन्याय केला जात आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना महावितरण कंपनीने कुठलीही पूर्व सूचना न देता २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित केला.तसेच ४० गावाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने काढल्याने शेतक-यांत संताप व्यक्त होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना महावितरण कंपनी जुलमी पद्धतीने वागत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यानी केला.अनेक शेतकरी कर्जर् बाजारीपणामुळे आत्महत्या करत असताना महावितरण कंपनीने शेतक-यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनामध्ये भाजपा सरकारबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.महावितरणकडे नागरिकांनी मीटर मिळण्याकरिता कोटेशन, नवीन मीटरची मागणी केली. परंतु त्या नागरिकांना पैसे भरूनही परवाना व मीटर देण्यात येत नाही. मागील पंधरवड्यात वादळ वा-याने पडलेले विद्युत खांब आजपर्यंत महावितरणकडून उभे करण्यात आले नाही.जमीनदोस्त झालेले खांब जशास तसे पहायला मिळत आहे. खांब पडून झालेले नुकसान व निर्माण झालेली वीज समस्या दूर करण्यासाठी कुठलीही योजना नाही. ग्राहकांना देण्यासाठी महावितरणकडे केबल, मीटर देखील नाहीत. महावितरणचे कर्मचारी हे रीडिंग घेण्यासाठी घरोघरी न जाता कुठेतरी एकाच ठिकाणी बसून अंदाजे रीडिंग टाकून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा पद्धतीने वीजबिल आकारले जाते. अशा एक ना अनेक समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार चालू आहे.तसेच महावितरण कंपनीने आपला मनमानी पणा थांबवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हा बँकेचे चेअरमन मनोज मरकड, जि.प.सदस्य विष्णूपंत गायकवाड, संजय पटेकर, भाऊसाहेब कनके, सदाशिव दुफाके, बापूराव खटके, किरण तारख, विकास कव्हळे, भागुजी मैंद, बाबासाहेब बोंबले, अशोक मांगदरे, राजन उढाण, सहदेव भारती, बाबासाहेब मस्के, सलीम शेख, बाबासाहेब गावडे,नारायण वायाळ, आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनNCPराष्ट्रवादी काँग्रेस