सटाणा येथेही तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:01 IST2020-05-19T21:45:11+5:302020-05-20T00:01:28+5:30
भाजपने सुरू केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

सटाणा येथेही तहसीलदारांना निवेदन
सटाणा : भाजपने सुरू केलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने आधारभूत किमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यानंतरही राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज तातडीने उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची आवश्यकता असल्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष संजय देवरे, जिल्हा सरचिटणीस साहेबराव सोनवणे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, माजी नगरसेवक मनोज सोनवणे, सरपंच संदीप पवार, विनोद अहिरे, रु पाली पंडित, अनिल पाकळे आदी उपस्थित होते.