शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 00:28 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन पिंपळगाव डुकरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान वाकचौरे हस्ते ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव डुकरा: सरपंचांनी घेतली तहसिलदारांची भेट

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानींचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन पिंपळगाव डुकरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान वाकचौरे हस्ते ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले आहे.इगतपुरी तालुक्यातील साकूर, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या घरांचे छप्पर उडाल्यामुळे तसेच जनावरांच्या पडवीसह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पिंपळगाव डुकरा येथील शेतकरी योगेश नंदू वाकचौरे यांच्या गट क्रमांक ४०९ मधील पोल्ट्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, पोल्ट्रीवरील सर्व पत्रे उडाले. या नुकसानीमुळे सदर नुकतेच बांधलेल्या शेडचे लाखोचे नुकसान झाल्याचे समजते. यामुळेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी यासाठी पिंपळगाव डुकराचे सरपंच यांच्यासह परिसरातील सरपंच व पदाधिकारी यांनी इगतपुरीचे तहसिलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी सरपंच भगवान वाकचौरे, देविदास देवगिरे, गणेश टोचे, साहेबराव बाबळे, अशोक बोराडे, दिलीप पोटकुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Rainपाऊसgram panchayatग्राम पंचायत