शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी पंचायत समिती मेळाव्यास प्रारंभ

By admin | Updated: August 4, 2014 00:51 IST

मालेगावी पंचायत समिती मेळाव्यास प्रारंभ

मालेगाव कॅम्प : येथील पंचायत समितीतर्फे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत पंचायत सबलीकरण मेळावा व नेतृत्व विकास शिबिरास प्रारंभ करण्यात आला आहे.दिनांक ३० जुलै ते ७ आॅगस्ट दरम्यान हे अभियान तालुक्यातील प्रमुख मंडळनिहाय गावांमध्ये राबविले जाणार आहे. गेल्या मार्च महिन्यात या अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला. त्यात पंचायतराज व्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी यंत्रणा, पदाधिकारी सदस्यांचे सक्षमीकरण करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, माहिती शिक्षण संप्रेषण कार्यक्रमाद्वारे पंचायतराज अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद प्रभाग पातळीवर नेतृत्व विकास शिबिर उपक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये नाव नोंदणी व प्रस्तावना, अभियानाची ओळख, आपल्या तालुक्याची सद्यस्थिती, ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण, महिला ग्रामपंचायत सदस्यांसाठी क्रांतिज्योती प्रशिक्षण, गटनिहाय विविध विषयांवर चर्चा आदि विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. बुधवारी चंदनपुुरी येथून या अभियानास सुरुवात झाली. येत्या रविवारी ४ आॅगस्टला मालेगाव पंचायत समिती सभागृहात पंचायत सबलीकरण मेळावा आहे . तसेच येत्या ७ आॅगस्टला वडनेर येथे या अभियानाचा समारोप होईल. या अभियानांतर्गत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी यशवंत पंचायतराज अभियानातील सर्व माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे या अभियान व मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती सभापती वंदना पवार, गटविकास अधिकारी एस. बी. अजवेलकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)