शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

गौरींबरोबर बाप्पांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:57 IST

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’ असे म्हणत सात दिवसांच्या बाप्पासह तीन दिवसांच्या माहेरवाशीण गौरींनाही गुरुवारी (दि. ३१) हळव्या मनाने निरोप देण्यात आला. शहरातील गोदाघाटासह सोमेश्वर, नवश्या गणपती मंदिर, आनंदवली, आसारामबापू पूल आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

नाशिक : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’ असे म्हणत सात दिवसांच्या बाप्पासह तीन दिवसांच्या माहेरवाशीण गौरींनाही गुरुवारी (दि. ३१) हळव्या मनाने निरोप देण्यात आला. शहरातील गोदाघाटासह सोमेश्वर, नवश्या गणपती मंदिर, आनंदवली, आसारामबापू पूल आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.गेल्या अनेक दिवसांपासून शहर परिसरात झालेल्या पावसामुळे तसेच धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीपात्रातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर, नवश्या गणपती आदी ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी होडीतून गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. गणेश विसर्जनादरम्यान आबालवृध्दांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजरासह गुलालाची उधळण करण्यात आली. गंगापूररोड परिसरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही काळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. गौरी विसर्जनासह अनेक गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पालाही सातव्या दिवशी भावपूर्ण निरोप दिला. दुपारी दीड वाजेपासून ‘बाप्पा’ विसर्जनासाठी घाटावर येत होते. विसर्जन घाटावर भाविकांनी गणेशमूर्तीसह गौरींचे मुखवटेही आणले होते. यावेळी मातीच्या मुखवट्यांचे विसर्जन तर पितळी मुखवट्यांना नदीच्या पाण्याने स्रान घालण्यात आले.