मनमाड : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठूमाउलीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविंकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ, अमरावती व खामगाव स्थानकावरून येत्या ६ जुलैपासून या विशेष रेल्वेगाड्यांच्या फेºया सुरू होणार आहे.दि. ६ व ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता नवीन अमरावती रेल्वेस्थानकातून विशेष गाडी क्रमांक ०११५५ पंढरपूरसाठी रवाना होईल व दुसºया दिवशी सकाळी सव्वाअकराला पंढरपूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी दि. ७ आणि १३ जुलै रोजी पंढरपूर येथून दुपारी ४ वाजता सुटून दुसºया दिवशी सकाळी पावणेअकरा वाजता अमरावतीला पोहचेल.खामगाव येथूननही पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०११५३ ही ७ व १० जुलै रोजी सोडली जाणार आहे. खामगाव रेल्वेस्थानकावरून सव्वाचारला ही गाडी सुटून दुसºया दिवशी सकाळीसव्वाअकरा वाजता पंढरपूर येथे पोहचणार आहे.१४ जुलै रोजी पंढरपूर रेल्वेस्थानकावरून दुपारी ४ वाजता गाडी सुटून दुसºया दिवशी सकाळी साडेआठ वाजता खामगाव स्थानकावर पोहचेल. पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात येणाºया या गाड्यांमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. खामगाव रेल्वेस्थानकावरून सव्वाचारला ही गाडी सुटून दुसºया दिवशी सकाळी सव्वाअकरा वाजता पंढरपूर येथे पोहचणार आहे.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:00 IST
महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठूमाउलीच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविंकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ, अमरावती व खामगाव स्थानकावरून येत्या ६ जुलैपासून या विशेष रेल्वेगाड्यांच्या फेºया सुरू होणार आहे.
पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन
ठळक मुद्देपंढरपूर यात्रा । मनमाड स्थानकातून भाविकांसाठी विशेष सोय