लवकरच पुरस्कार वितरण : अध्यक्ष, शिक्षण सभापतींनी केली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2016 00:34 IST2016-09-06T00:31:33+5:302016-09-06T00:34:38+5:30

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Soon the prize distribution: The announcement made by Chairman, Education Chairman | लवकरच पुरस्कार वितरण : अध्यक्ष, शिक्षण सभापतींनी केली घोषणा

लवकरच पुरस्कार वितरण : अध्यक्ष, शिक्षण सभापतींनी केली घोषणा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे गुणवंत पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, या पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष विजयश्री चुंबळे व शिक्षण सभापती किरण पंढरीनाथ थोरे यांनी केली.
५ सप्टेंबरला शिक्षक पुरस्कार वितरण अपेक्षित असले तरी गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळे हे पुरस्कार स्वतंत्रपणे एका सोहळ्यात वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली. पुरस्कारासाठी १५ तालुक्यांतून २८ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते. या प्रस्तावांची पडताळणी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यानंतर निवड समितीने पुरस्कारप्राप्त शिक्षकांची निवड करून प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. आयुक्तांच्या मंजुरीनंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Soon the prize distribution: The announcement made by Chairman, Education Chairman