As soon as the elections were announced, the offices of MNS, BJP were buzzing | निवडणुका जाहीर होताच मनसे, भाजपाची कार्यालये गजबगली

निवडणुका जाहीर होताच मनसे, भाजपाची कार्यालये गजबगली

ठळक मुद्देविविध पक्ष कार्यालयांमध्ये वाढली कार्यकर्त्यांची गजबज निवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यात अनेक कार्यकर्ते होतेच परंतु नेत्यांचे आगमन झााल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षात प्रथमच गर्दी झाली होती. अन्य पक्षांच्या कार्यालयांमध्ये मात्र पुर्ण वेळ कर्मचारी अथवा कार्यकर्ते वगळता फारशी गर्दी नव्हती. मात्र सायंकाळ नंतर अन्य पक्ष कार्यालये देखील गजबजली होती. 
निवडणूक आयोगाने शनिवारी (दि.२१) विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या नाशिक शहर व जिल्हा कार्यालयातील गर्दी नव्हती.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणाचीही उपस्थिती नसल्याचे दिसून आले. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला गल्ली ते दिल्ली म्हणजेच महापालिकेपासून लोकसभेपर्यंत सत्ता मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आलेल्या या पक्षाच्या मध्यवर्ती  कार्यालयात कर्मचाऱ्यांसोबतच कार्यकर्ते अणि राज्यस्तरीय पदाधिकाºयांची देखील उपस्थिती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गजबजलेल्या या कार्यालयात अजूनही पक्षचिन्ह व प्रचार साहित्याचा रखरखाव व नियोजन सुरू आहे, तर शिवसेनेच्या कार्यालयात नियमित काम करणारे कर्मचारी व कार्यकर्ते दिसून आले.
 विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून बाहेर राहूनही लाखोंच्या सभा घेऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय शनिवारी दिवसभर गजबजलेले होते. पक्ष विधानसभा नवडणूक लढविणार की नाही याविषयी साशंकता व्यक्त होत असताना पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे नाशिक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये असल्यामुळे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील पदाधिकारी यांनी पक्षाच्या कार्यालयामध्ये गर्दी केली होती. 
काँग्रेस कमिटीचेही कुलूप उघडले 
लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून पराभवाचा सामना करावा लागल्यापासून गलीतगात्र झालेल्या काँग्रेसचे शहर व जिल्हा कार्यालय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बंदच होते. परंतु निवडणुकीचे वेध लागल्याने पक्षाचे शहर व जिल्हा कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले आहे. मात्र याठीकाणी जिल्हा कार्यकारिणी अथवा शहर कार्याकारिणीसह कोणीही कार्यकर्ते अथवा नेते फिरकत नसल्याने येथील शुकशुकाट कायम आहे. 
 

Web Title: As soon as the elections were announced, the offices of MNS, BJP were buzzing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.