शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:31 IST

मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील महिला गृहपालांची ११६ पदे ही कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थेमार्फत भरण्याच्या निर्णयाविरोधात समाजकल्याण कर्मचाऱ्यांनी पुकारलेले लेखनीबंद आंदोलन समाजकल्याण सचिवांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे.

नाशिक : मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील महिला गृहपालांची ११६ पदे ही कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थेमार्फत भरण्याच्या निर्णयाविरोधात समाजकल्याण कर्मचाऱ्यांनी पुकारलेले लेखनीबंद आंदोलन समाजकल्याण सचिवांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून कर्मचाºयांनी असहकार पुकारल्यामुळे येथील कामकाजावर परिणाम झाला होता. दरम्यान, आचारसंहितेनंतर होणाºया प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.समाजकल्याण विभागातील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील पदे खासगीकरणातून भरण्याचे आदेश शासनाने काढल्याने गेल्या २५ तारखेपासून राज्यातील समाजकल्याण कर्मचाºयांनी लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. शासनाच्या निर्णयामुळे समाजकल्याण कर्मचाºयांच्या पदोन्नतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. शिवाय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षिततेचा मुद्दादेखील उपस्थित करण्यात येऊन आंदोलनाला सुरुवात झाली होती. सलग तीन दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे समाजकल्याण विभागातील कामकाज ठप्प झाले होते.नाशिकसह राज्यातील समाजकल्याण विभागात आंदोलन सुरू करण्यात आल्याने समाजकल्याण विभागाने या आंदोलनाची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाºयांशी गेल्या २७ रोजी मुंबईत बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी समाजकल्याण सचिवांनी सेवेत असलेल्या पात्र समाजकल्याण निरीक्षक तसेच तत्सम उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, असे सांगून उर्वरित कर्मचाºयांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेतले जाईल. त्यानंतर उर्वरित जागांसाठी जाहिरात काढून अर्ज मागविण्यात येतील व त्यातून उमेदवारांची निवड करण्याचे मान्य केले.आचारसंहिता सुरू असल्याने निर्माण झालेली तांत्रिक अडचण लक्षात घेता सचिवांनी दिलेल्या आश्वासनानंतर तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आल्याचे संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र देवरे यांनी सांगितले. आचारसंहितेनंतर प्रत्यक्षात यासंदर्भात कोणती कार्यवाही केली जाते यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सध्या सेवेत असलेल्या कर्मचाºयांवर अन्याय होणार नसल्याचे सचिवांनी सांगितल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.सचिवांनी दिलेल्या आश्वासनामुळे तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे. आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय लागलीच होणे शक्य नसल्याने सचिवांनी दिलेल्या आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यात येत आहे. आचारसंहितेनंतर प्रत्यक्षात काय निर्णय घेतला जातो यावर संघटनेची अंतिम भूमिका घेतली जाईल. तूर्तास आंदोलन स्थगित ठेवण्यात आले आहे.  - राजेंद्र देवरे, सचिव, समाजकल्याण विभाग

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार