हळदीच्या कार्यक्रमावरुन येताना काळाची झडप; ट्रकच्या धडकेत दोघे मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:43 PM2021-03-10T13:43:25+5:302021-03-10T13:45:33+5:30

श्री.श्री.रविशंकर दिव्य मार्गावरुन पुणे महामार्गापासून वळण घेत मुंबईकडे जाणारी अवजड वाहतुक वडाळामार्गे राजसारथी कलानगर येथून पुढे राजीवनगरमार्गे मुंबई महामार्गावरुन रवाना होतात. या अवजड वाहतुकीमुळे लोकवस्तीमधील सुरक्षितता धोक्यात येत आहे.

A snap of time coming from a turmeric event; Two friends killed in truck crash | हळदीच्या कार्यक्रमावरुन येताना काळाची झडप; ट्रकच्या धडकेत दोघे मित्र ठार

हळदीच्या कार्यक्रमावरुन येताना काळाची झडप; ट्रकच्या धडकेत दोघे मित्र ठार

Next
ठळक मुद्देराजीवनगरजवळ दुर्घटनाअवजड वाहतुकीमुळे सुरक्षितता धोक्यात

इंदिरानगर : पंचवटी परिसरातून बहिणीची हळद आटोपून राजीवनगरकडे दुचाकीने परतत असताना दोघा युवकांवर काळाने घाला घातला. एका मालवाहु अवजड ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यु झाल. या घटनेने संपुर्ण  परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुध्द इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शुभम गवळी (२२,रा.चुंचाळे), राहुल सुर्यवंशी (२५,रा.सावतानगर, सिडको) हे दोघे मित्र त्यांच्या दुचाकीने मंगळवारी (दि.९) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शंभरफुटी रस्त्याने कलानगर सिग्नलवरुन डावीकडे वळण घेत राजीवनगरमार्गे मार्गस्थ होत असताना त्यांच्या दुचाकीला एका मालवाहु ट्रकच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ट्रकने (एम.एच१९ झेड ४०५४) दुचाकीला (एम,एच१८ एएम२०७८) जोरदार धडक दिली. या धडकेत दोघा मित्रांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीत मृत्यु झाला. हा अपघात राजीवनगरजवळील वळणावर झाला. शुभम व राहुल हे त्यांच्या मित्राच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम तपोवन परिसरातून आटोपून घरी परतत होते. यावेळी त्यांच्यावर काळाने झडप घातली. रात्रीच्या वेळी झालेल्या या अपघाताच्या वेळी ट्रकचालकाने जखमी अवस्थेतील या दोघांना मदत करण्याऐवजी ट्रकसह घटनास्थळावरुन पोबारा केला. त्याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार ट्रकचालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
-
अवजड वाहतुकीमुळे सुरक्षितता धोक्यात
श्री.श्री.रविशंकर दिव्य मार्गावरुन पुणे महामार्गापासून वळण घेत मुंबईकडे जाणारी अवजड वाहतुक वडाळामार्गे राजसारथी कलानगर येथून पुढे राजीवनगरमार्गे मुंबई महामार्गावरुन रवाना होतात. या अवजड वाहतुकीमुळे लोकवस्तीमधील सुरक्षितता धोक्यात येत आहे. अवजड वाहतुक या मार्गे वळविण्यात आल्याने इंदिरानगर परिसरातील नागरिकांनी विरोधही दर्शविला होता. कलानगर येथील सिग्नलजवळ वाहतुक कोंडीलाही या अवजड वाहनांमुळे निमंत्रण मिळते.

Web Title: A snap of time coming from a turmeric event; Two friends killed in truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.