वाजे विद्यालयात सर्प छायाचित्र प्रदर्शन

By Admin | Updated: August 4, 2014 00:49 IST2014-08-03T20:52:46+5:302014-08-04T00:49:07+5:30

वाजे विद्यालयात सर्प छायाचित्र प्रदर्शन

Snake photo demonstration in the school | वाजे विद्यालयात सर्प छायाचित्र प्रदर्शन

वाजे विद्यालयात सर्प छायाचित्र प्रदर्शन

 

सिन्नर : येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनाअंतर्गत इको-क्लबच्या वतीने श्रावण शुद्धपंचमी (नागपंचमी) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या जातींच्या सापांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात हरितसेना विभागप्रमुख एस. टी. पांगारकर यांनी सर्पाच्या
जाती-विषारी व बिनविषारी साप, सापांच्या शरीर रचना, सापांचे अन्न, सापांचा अधिवास, सर्पदंश व त्यावरील उपाय, सापांविषयी समज-गैरसमज, सापांचे उपयोग आदि मुद्यांना अनुसरून सविस्तर माहिती दिली.
शेतीमालाचे नुकसान करणारे उंदीर हे सर्पांचे अन्न आहे. एक साप दरवर्षी किमान २०० उंदीर भक्षण करतो. साप शेतकऱ्यांचा मित्र
आहे. त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असून, तो अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक असल्याचे पांगारकर यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक एस. एस. खैरनार, उपमुख्याध्यापक आर. पी. म्हस्के, पर्यवेक्षक बी. आर. कहांडळ, उपशिक्षक जी. एस. खैरनार, पी. आर. फटांगळे, एम. के. कासार, सौ. व्ही. डी. सोनवणे, श्रीमती पी. डी. जाधव. के. एस. नवले, एस. एम. सोनवणे आदिंसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Snake photo demonstration in the school