शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅपच्या ‘ओव्हर स्मार्ट’ करामती!

By admin | Updated: May 3, 2017 01:04 IST

महापालिकेची ‘अशीही’ जागरूकता : मीना माळोदे महापौर तर नयना घोलप उपमहापौर, सदस्यांच्या छायाचित्रांमध्ये घोळ

नाशिक : हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची प्रवृत्ती महापालिकेच्या प्रशासनातही भिनली असून, पावणेदोन वर्षांपूर्वी नाशिककरांसाठी खुल्या केलेल्या ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅपच्या अद्ययावतीकरणाकडे साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. महापालिकेच्या ‘जागरूक’ प्रशासनाने सन २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे अ‍ॅपवर लोड केली असली तरी पुरुषाच्या ठिकाणी स्त्री आणि स्त्रीच्या ठिकाणी महिला अशी छायाचित्रे टाकल्याने स्मार्ट अ‍ॅपच्या या ‘ओव्हर स्मार्ट’ करामती मनोरंजनाचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे महापौर रंजना भानसी यांच्याऐवजी माजी नगरसेवक मीना माळोदे यांचे तर उपमहापौर प्रथमेश गिते यांच्याऐवजी माजी महापौर नयना घोलप यांचे छायाचित्र टाकण्यात आले आहे.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिकचा प्रस्ताव पाठविण्यापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट नाशिक’ ह्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली होती. या मोबाइल अ‍ॅपवर अन्य सर्व सुविधा उपलब्ध करून देतानाच पदाधिकारी व नगरसेवकांची माहिती व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकही देण्यात आले होते. दि. १५ सप्टेंबर २०१५ रोजी ‘स्मार्ट नाशिक’ अ‍ॅपसह स्मार्ट सिटी संकेतस्थळाचे लोकार्पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर अ‍ॅपच्या उपयुक्ततेबद्दल नेहमीच तक्रारी प्रशासनाकडे येत राहिल्या. मात्र, अ‍ॅपच्या अद्ययावतीकरणाकडे प्रशासनाकडून फारसे गांभीर्याने घेण्यात आले नाही. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक पार पडली. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे, त्यांचे पत्ते व भ्रमणध्वनी क्रमांक अ‍ॅपवर टाकण्यात आले आहेत. परंतु, नावे टाकताना छायाचित्रांमध्ये कमालीचा गोंधळ करून ठेवण्यात आला आहे.