शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

सहा कोटींचा अपहार; २४ संशयितांवर गुन्हा

By admin | Updated: January 5, 2017 02:17 IST

श्री गणेश बॅँक : अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश, गैरव्यवहार उघड

नाशिक : श्री गणेश सहकारी बॅँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापसात संगनमत करून बनावट कर्जप्रकरणे दाखल करून घेत बॅँक व ठेवीदारांचा विश्वासघात करत सुमारे ६ कोटी ७ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार लेखापरीक्षणात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकूण २४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकस्तंभावरील श्री गणेश नागरी सहकारी बॅँकेतील २४ कर्मचाऱ्यांनी आपापसात संगनमत करत सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याची बाब सनदी लेखापाल अजय नंदलाल राठी यांच्या निदर्शनास आली.
राठी यांनी याबाबत संबंधितांच्या नावांसह सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण २४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दाखल झालेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पडताळणी सुरू केली असून, या प्रकाराचा तपास वेगाने सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली आहे.
श्री गणेश सहकारी बॅँकेमध्ये २०१२ ते २०१४ सालापर्यंत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, लिपिक, शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने बॅँकेचा व ठेवीदारांचा विश्वासघात करून बॅँकेत बनावट कर्जप्रकरणे दाखल करून घेत एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राठी यांनी बॅँकेचे संपूर्ण लेखापरीक्षण केले असता सदरचा गैरव्यवहार त्यांच्या निदर्शनास आला.
संशयितांनी अशोकस्तंभ येथील बॅँकेच्या मुख्य शाखेत सहा कोटी सात लाख रुपयांचा अपहार करून पिंपळगाव बसवंत येथील शाखेतही अशाच प्रकारे अपहार केला आहे. दोन्ही शाखांचा मिळून ६ कोटी ७ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केला आहे. (प्रतिनिधी)