शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला एकाच दिवसात 32 रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:51 IST

सिन्नर:शहरासह तालुक्यातील 32 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 10 तर ग्रामीण भागातील 7 असे एकुण 17 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून कोरोना बाधितांची संख्या 627 वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे17 रुग्णांची भर: 627 कोरोना बाधित

सिन्नर : शहरासह तालुक्यातील 32 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 10 तर ग्रामीण भागातील 7 असे एकुण 17 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून कोरोना बाधितांची संख्या 627 वर पोहचली आहे.शहरातील लोंढे गल्लीत 53 व 32 वर्षीय पुरुष, अश्विनाथ नगरमध्ये 34 वर्षीय पुरुष व 28 वर्षीय महिला, सरदवाडी रोडवर 57 वर्षीय पुरुष, जयभवानी रोडवर 70 वर्षीय पुरुष, संजीवनी नगरमध्ये 35 वर्षीय महिला, विजय नगरमध्ये 29 वर्षीय पुरुष, कानडी मळ्यात 70 वर्षीय महिला, वृंदावन नगरमध्ये 38 वर्षीय पुरुष तर ग्रामीण भागातील गुळवंच येथे 5 रुग्ण आढळून आले असून त्यात 70 वर्षीय पुरुष व महिला, 65 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणी, डुबेरे येथे 89 वर्षीय महिला, दोडी बुद्रुक येथे 29 वर्षीय पुरुष असे तालुक्यात एकुण 17 रुग्णांची भर पडली आहे.दरम्यान, सोमवारी (दि.3) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 8 रुग्णांची भर पडली होती. त्यात शहर व ग्रामीण प्रत्येकी 4 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील कमलनगर भागात 16 वर्षीय युवक, आश्विनाथ नगरमध्ये 32 वर्षीय पुरुष, संजीवनी नगरमध्ये 47 वर्षीय पुरुष तर कानडी मळ्यातील 38 वर्षीय पुरुष तर ग्रामीण भागात पांढुर्ली येथे 33 वर्षीय पुरुष, लोणारवाडीत 19 वर्षीय युवक, मनेगाव येथे 27 वर्षीय तरुण व जायगाव येथे 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकुण 627 कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. मंगळवारी 32 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आत्तापर्यंत 475 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली. 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याsinnar-acसिन्नर