शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

कळवण शहरातून एकेरी वाहतूक

By admin | Updated: April 10, 2017 00:46 IST

कळवण : श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बोल अंबामात की जयचा जयघोष करीत लाखो देवीभक्त व भाविक कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करीत आहेत.

 कळवण : श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बोल अंबामात की जयचा जयघोष करीत लाखो देवीभक्त व भाविक कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे कळवण शहरातून एकेरी वाहतूक सुरु आहे. चैत्रोत्सव निमित्ताने रस्त्यावरील पदयात्रेमुळे कळवण परिसरातील सप्तशृंगगडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले आहेत. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले आहेत.दरवर्षी चैत्रोत्सवात सप्तशृंगगडावर लाखो भाविक हजेरी लावत असतात. खान्देश, उत्तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील सेंधवा परिसरातील भाविकदेखील गडावर पायी दाखल झाले असून, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखो देवीभक्तांनी सप्तशृंगीमातेच्या चरणी लीन होऊन दर्शन घेत आपली इच्छा प्रकट करून आशीर्वाद मागितला. रामनवमीपासून दूरदूरचे भाविक गडाकडे मार्गक्रमण करतात त्यामुळे कळवणपासून सप्तशृंगगडाकडे जाणारा रस्ता हा चैत्रोत्सवात भक्तिमार्ग होऊन जातो. ऐन चैत्रातील रणरणत्या तपमानाच्या कडक उन्हात विविध वयोगटातील स्त्री-पुरुष, आबालवृद्ध कसलीही पर्वा न करता उन्हाच्या झळा अंगावर घेत सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करताना दिसून येत आहेत.कोणी पन्नास, कोणी शंभर तर कोणी दोनशे ते तीनशे किलोमीटर अंतरावरु न उन्हातान्हाची पर्वा न करता गडाकडे पायी जात असल्यामुळे या भाविकांच्या सेवेसाठी वसाकामार्गे, पिळकोसमार्गे व वरवंडीपासून कळवणकडे येणारे रस्ते ते थेट नांदुरी गडापर्यंत तसेच कळवण शहरात विविध सेवाभावी संस्था, मित्रमंडळे, संघटना, व्यावसायिक प्रतिष्ठाने, परिवारांतर्फे मोफत अन्न-पाणी, निवारा-अंघोळीपर्यंतची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धुळे ते मालेगाव ते कळवणपर्यंत विविध ठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी महाप्रसादाची सोय केली जात असली तरी यातील काही ठिकाणच्या भोजनाची व्यवस्था ही अधिक लक्षात राहणारी आहे.