कळवण शहरातून एकेरी वाहतूक

By Admin | Updated: April 10, 2017 00:46 IST2017-04-10T00:46:48+5:302017-04-10T00:46:58+5:30

कळवण : श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बोल अंबामात की जयचा जयघोष करीत लाखो देवीभक्त व भाविक कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करीत आहेत.

Single transportation from Kalvan city | कळवण शहरातून एकेरी वाहतूक

कळवण शहरातून एकेरी वाहतूक

 कळवण : श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बोल अंबामात की जयचा जयघोष करीत लाखो देवीभक्त व भाविक कळवण शहरातून सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे कळवण शहरातून एकेरी वाहतूक सुरु आहे.
चैत्रोत्सव निमित्ताने रस्त्यावरील पदयात्रेमुळे कळवण परिसरातील सप्तशृंगगडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले आहेत. या देवीभक्तांच्या सेवेसाठी कळवण शहरातील गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले आहेत.
दरवर्षी चैत्रोत्सवात सप्तशृंगगडावर लाखो भाविक हजेरी लावत असतात. खान्देश, उत्तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमधील सेंधवा परिसरातील भाविकदेखील गडावर पायी दाखल झाले असून, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखो देवीभक्तांनी सप्तशृंगीमातेच्या चरणी लीन होऊन दर्शन घेत आपली इच्छा प्रकट करून आशीर्वाद मागितला. रामनवमीपासून दूरदूरचे भाविक गडाकडे मार्गक्रमण करतात त्यामुळे कळवणपासून सप्तशृंगगडाकडे जाणारा रस्ता हा चैत्रोत्सवात भक्तिमार्ग होऊन जातो. ऐन चैत्रातील रणरणत्या तपमानाच्या कडक उन्हात विविध वयोगटातील स्त्री-पुरुष, आबालवृद्ध कसलीही पर्वा न करता उन्हाच्या झळा अंगावर घेत सप्तशृंगगडाकडे मार्गक्रमण करताना दिसून येत आहेत.
कोणी पन्नास, कोणी शंभर तर कोणी दोनशे ते तीनशे किलोमीटर अंतरावरु न उन्हातान्हाची पर्वा न करता गडाकडे पायी जात असल्यामुळे या भाविकांच्या सेवेसाठी वसाकामार्गे, पिळकोसमार्गे व वरवंडीपासून कळवणकडे येणारे रस्ते ते थेट नांदुरी गडापर्यंत तसेच कळवण शहरात विविध सेवाभावी संस्था, मित्रमंडळे, संघटना, व्यावसायिक प्रतिष्ठाने, परिवारांतर्फे मोफत अन्न-पाणी, निवारा-अंघोळीपर्यंतची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धुळे ते मालेगाव ते कळवणपर्यंत विविध ठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी महाप्रसादाची सोय केली जात असली तरी यातील काही ठिकाणच्या भोजनाची व्यवस्था ही अधिक लक्षात राहणारी आहे.

Web Title: Single transportation from Kalvan city