सिन्नर ते लासलगाव बसमध्ये एकच प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:02 PM2020-05-22T22:02:30+5:302020-05-22T23:51:36+5:30

नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिकेसह कन्टन्मेंट क्षेत्र वगळता सुरू करण्यात आलेल्या बससेसमध्ये शुक्रवारी (दि. २२) दिवभरात केवळ १३५ प्रवाशाांनी प्रवास केला. सिन्नरहून लासलगाव मार्गावरील बसमधून केवळ एका प्रवाशाने प्रवास केला, तर अन्य काही मार्गांवर दोन ते तीन प्रवाशांनीच प्रवास केला.

 Single passenger from Sinnar to Lasalgaon bus | सिन्नर ते लासलगाव बसमध्ये एकच प्रवासी

सिन्नर ते लासलगाव बसमध्ये एकच प्रवासी

Next

नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिकेसह कन्टन्मेंट क्षेत्र वगळता सुरू करण्यात आलेल्या बससेसमध्ये शुक्रवारी (दि. २२) दिवभरात केवळ १३५ प्रवाशाांनी प्रवास केला. सिन्नरहून लासलगाव मार्गावरील बसमधून केवळ एका प्रवाशाने प्रवास केला, तर अन्य काही मार्गांवर दोन ते तीन प्रवाशांनीच प्रवास केला. सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बसेस सुरू होऊनही नागरिकांनी प्रवास करण्याचे टाळले असल्याचे यावरून समोर आले आहे.
रेडझोन वगळता उर्वरित क्षेत्रामध्ये बससेवा सुरू करण्याबाबत १९ मे रोजीची महाराष्टÑ शासनाचे पत्र असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकारणाने या पत्रान्वये बसेस सुरू करण्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार नाशिक महानगरापालिका व मालेगाव महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्रांमध्ये सर्व नॉन रेडझोनमध्ये बससेवा सुरू करण्यात आली. मात्र प्रवाशांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्यामुळे अनेक बसेस रद्द करण्याचीदेखील वेळ महामंडळावर आली. सकाळी ७ वाजेपासून जिल्हांतर्गत बसेस सुरू करण्यात आल्या असल्या तरी दुपारपर्यंतही बसेसला कुठेही अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. आगारांवरदेखील वारंवार उद््घोषणा करूनही प्रवासी स्थानकात फिरकले नाही. बसमध्ये प्रवाशांना शारीरिक अंतराचे नियम पाळावे लागणार आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक करण्यात आला आहे.
महापालिकाक्षेत्र वगळून बसेस सुरू करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मनमाड, सटाणा, सिन्नर, नांदगाव, इगतपुरी, लासलगाव, कळवण, पेठ, येवला, पिंपळगाव येथून बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रवाशांच्या संख्येनुसार बसेस फेऱ्या वाढविण्याचेदेखील नियोजन करण्यात आले होते. मात्र प्रवाशांनीच पाठ फिरविल्याने अनेक बसेस रद्द करण्याची वेळ महामंडळावर आली.
सिन्नर लासलगाव मार्गावर केवळ एका प्रवाशाला घेऊन बस धावली. इगतपुरी-आंबेवाडी मार्गावर तीन, तर कळवण-देवळा मार्गावर केवळ दोन प्रवाशाांसाठी बस सोडावी लागली. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या बसेसमध्येही केवळ नऊच प्रवासी होते, तर पेठ-घुबडसाका दरम्यानच्या बसमध्येदेखील आठ प्रवासी होते. ज्या मार्गावर बसेसला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा होती अशा बसेसकडे प्रवाशांनी पाठ फिरविली. त्यामुळे तेथून एकही बस सुटू शकली नाही.
एकंदरीत प्रवाशांनी या काळात प्रवास करण्याचे टाळले असल्याचे दिसून आले. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे ज्याप्रमाणे टाळले जात आहेत याप्रमाणेच बसमधील संभाव्य गर्दी म्हणूनही प्रवाशांनी पाठ फिरविली असल्याचे बोलले जात आहे. या शिवाय ग्रामीण नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता आल्याचेदेखील यावरून समोर आले आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात प्रवासी बसमधून प्रवास करतील, असा विश्वास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
पेठ-हरसूल बस फुल्ल
दुसरीकडे पेठ-हरसूल मार्गावर चालविण्यात आलेल्या चार फेºयांमधून ६४ प्रवाशांनी प्रवास केला तर सिन्नर-ठाणगाव मधील आठ फेºयांमध्ये ३८ प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. पेठ-जाहुले मार्गावर दहा प्रवासी बसमध्ये होते. उर्वरित मार्गावर अत्यल्प आणि काही ठिकाणी प्रवासीच उपलब्ध होऊ शकले नाही.

Web Title:  Single passenger from Sinnar to Lasalgaon bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक