‘जय गुरूदेव, जय महावीर’च्या जयघोषात शोभायात्रा

By Admin | Updated: April 9, 2017 15:10 IST2017-04-09T14:27:07+5:302017-04-09T15:10:40+5:30

शहरातून भव्य मिरवणूक रविवारी (दि.९) सकाळी काढण्यात आली मिरवणूकीला दहीपूल येथून सुरूवात

Shobayatra in Jai Gurudev, Jai Mahavir ji gorge | ‘जय गुरूदेव, जय महावीर’च्या जयघोषात शोभायात्रा

‘जय गुरूदेव, जय महावीर’च्या जयघोषात शोभायात्रा

नाशिक : शहरातून भव्य मिरवणूक रविवारी (दि.९) सकाळी काढण्यात आली मिरवणूकीला दहीपूल येथून सुरूवात करण्यात आली होती. मिरवणूकीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्रभागी आकर्षक सजविलेल्या बग्गीमध्ये भगवान महावीर यांची मुर्ती घेऊन धर्मगुरू विराजमान होते. भगवान महावीर जयंती निमित्त नाशिक शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभयात्रेला दहीपुल येथून सकाळी साडे 8 वाजता सुरुवात झाली. शोभायात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. जय गुरुदेव, जय महावीर, चा जयघोष करीत लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत बालगोपालांनी साध्वी, राधा, श्रीकृष्ण, आदींच्या वेशभूषा केल्या होत्या. यावेळी गोसेवा व गोमाता रक्षणाचा संदेश देण्यात आला. चारचाकी मोटारींवर भगवान महावीर यांच्या प्रतिमा होत्या. अग्रभागी बग्गीमध्ये भगवान महावीर यांची मूर्ती घेऊन धर्मगुरु विराजमान होते.

 

 

 

Web Title: Shobayatra in Jai Gurudev, Jai Mahavir ji gorge