शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची ‘प्लंबर तुमच्या घरी’ मोहीम

By admin | Updated: January 21, 2016 23:33 IST

पाणी गळती थांबविणार : शिवसैनिक करणार बचतीचा जागर

नाशिक : एकीकडे पाणीकपातीवरून राजकारण सुरू असतानाच शिवसेनेने भविष्यातील संकटाची स्थिती ओळखत सामाजिक दायित्व म्हणून पाणी गळती थांबविण्यासाठी ‘प्लंबर तुमच्या घरी’ ही मोहीम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सहाही विभागांकरिता कुशल प्लंबर्सचे पथकच तयार करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. शहरात पाणीकपात करायची की नाही, यावरून महापालिकेतील सत्ताधारी गट विरुद्ध भाजपा यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. परंतु, पाणीबचतीसाठी शिवसेनेने घरोघरी जाऊन गळती थांबविण्याचा आणि नागरिकांना पाणी बचतीसाठी आवाहन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार त्या-त्या विभागातील उपमहानगरप्रमुख व विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली प्लंबर्सचे पथक जाऊन तेथील वस्त्यांमधील स्टॅण्डपोस्ट, सोसायट्यांमधील नळजोडणी, रस्त्यांवरील पाइपलाइन यामधील गळती शोधून ती थांबविण्याचा प्रयत्न करणार आहे. सदर प्लंबिंग दुरुस्ती ही मोफत करून दिली जाणार आहे. याचवेळी घरोघरी शिवसैनिक जाऊन पाणीबचतीचा जागर करणार आहेत. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत २३ जानेवारीला महिलांच्या तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात येणार आहे. शहरात चेनस्नॅचिंग, छेडछाड, मोबाइल चोरी आदि घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही. पोलीस ठाण्यात तक्रारीही नोंदवून घेण्यात टाळाटाळ होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यालयात सकाळी १० ते ५ या वेळेत हेल्पलाइन सेवा कार्यरत करण्यात येणार असून, घरगुती वाद वगळता महिलांच्या अन्य तक्रारी सोडविण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्यासाठी सेनेचा लिगल सेल कार्यरत राहणार असल्याचेही बोरस्ते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)