शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगरमधील महिलेचा चाकूने भोसकून खून

By admin | Updated: January 8, 2015 00:35 IST

जिजामाता मार्केटजवळील घटना : संशयिताचा शोध सुरू

नाशिक : सातपूर येथील शिवाजीनगर परिसरातील जिजामाता मार्केटजवळ बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका पस्तीस वर्षीय महिलेवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली.या घटनेनंतर मारेकरी फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे़शोभा संजय पाटील (३५, गणेश प्रसाद सोसायटी, शिवशक्ती चौक, सातपूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, त्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन रायिटंग कंपनीत कामास होत्या. सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्या कंपनीत कामासाठी पायी जात होत्या़ जिजामाता मार्केटजवळ त्या पोहोचल्या असता त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्याने चाकूने हल्ला करून पलायन केले़ या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती़ महिलेचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर काळे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली़ संजय पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ फिर्यादीत आर्थिक देवाण-घेवाणीतून खून केल्याचे म्हटले आहे. मयत शोभा पाटील या सुरुवातीस ओझर येथे वास्तव्यास होत्या. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या इसमाने टेम्पो विकत घेण्यासाठी पाटील यांच्याकडून ४० हजार रु पये उसने घेतले होते; मात्र पैसे देण्यास तो टाळाटाळ करीत होता़ तसेच संशयिताने वेळोवेळी पाटील यांच्या वडिलांना फोन करून, ‘तुमच्या मुलीने व जावयाने माझ्याकडून तीन लाख रु पये घेतले आहेत, ते परत करा, अन्यथा मी तुमचा जावई व मुलीला पाहून घेईन’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे शोभा पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात ९ सप्टेंबर २०१४ रोजी राजू कुयटे या संशियताविरोधात जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्र ार दिली होती. भर रस्त्यात महिलेची हत्त्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे़ दरम्यान, नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)