शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा

By Admin | Updated: September 3, 2016 23:04 IST2016-09-03T23:03:20+5:302016-09-03T23:04:50+5:30

शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा

Shadmati Ganesh idol Workshop | शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा

शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळा

 सिन्नर : येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत सिन्नर युवा प्रतिष्ठान व शाळेच्या वतीने आयोजित शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेत सुमारे १७० विद्यार्थ्यांनी सहभागी होत आकर्षक गणपती साकारले.
मुख्याध्यापक एस. आर. आव्हाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. सिन्नर युवा प्रतिष्ठानचे नीतेश दातीर, आश्विनी रायजादे, सतिष आठवले, तेजस शिंदे, हरिष बदडे, अजय बाकळे, विकास गिते यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांनी आपली कल्पकता वापरुन श्रीगणेशाच्या सुबक मूर्ती बनवल्या.
याप्रसंगी मुख्याध्यापक आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी शाडूमातीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींचे महत्व सांगितले.
याप्रसंगी सुजोत कुमावत, वंदना मते, सुनीता मोरे, संगीता लोंढे, उषा पेंढारी, शारदा भगत, अलका धरम, राणी वाघ, सोनाली उगले यांनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Shadmati Ganesh idol Workshop