शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या मदतीला सरसावल्या विद्यार्थिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:45 IST

Maharashtra Assembly Election 2019शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काही केंद्रांचा अपवाद वगळता सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून आला. पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्र गाठून मतदान केले.

नाशिक : शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात काही केंद्रांचा अपवाद वगळता सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून आला. पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडत मतदानासाठी मतदान केंद्र गाठून मतदान केले. यावेळी पंचवटी भागातील आरपी विद्यालयासह विविध विद्यालयांतील विद्यार्थिनींनी ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना केंद्राच्या प्रवेशद्वारापासून प्रत्यक्ष मतदान कक्षापर्यंत पोहोचविण्यासाठी आधार देत महत्त्वाची भूमिका पार पाडली.नाशिक शहरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध सामाजिक संघटनांसह स्वयंस्वेवी गट कार्यरत असताना आरपी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही या लोकोत्सवात मोलाचे योगदान दिले. या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रावर पंचवटीतील ज्येष्ठ नागरिकांना वाहन तळापासून ते मतदान केंद्र्रापर्यंत जाण्यासाठी या विद्यार्थिनींनी आधार दिला. तर काही विद्यार्थ्यांनी मतदारांना त्यांचे नाव यादीत शोधून देण्यासाठी मदत केली. त्यामुळे मतदारांना तात्काळ आपला हक्क बजावता आला.काही ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांचे कुटुंबीय असले तरी त्यांना प्रवेशद्वारापासून मतदान कक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागत असताना विद्यार्थिनींची मदत अमूल्य ठरली. तर एकट्या आलेल्या ज्येष्ठ मतदारांना केंद्राच्या प्रवेशद्वारापासून मतदान केंद्र अधिकाऱ्यांपर्यंतची नोंद करण्यापर्यंत विद्यार्थिनींनी आधार दिला. तसेच मतदान झाल्यानंतर पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना प्रवेशद्वारापर्यंत आणि वाहनतळापर्यंत सोडण्यासाठी मोलाची मदत केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-east-acनाशिक पूर्वVotingमतदानStudentविद्यार्थी