पिस्तुलधारी कार्यकर्त्यामुळे सुरक्षिततेचे धिंडवडे

By Admin | Updated: March 31, 2017 00:50 IST2017-03-31T00:42:05+5:302017-03-31T00:50:14+5:30

नाशिक : राजीव गांधी भवनमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या बंधूने कमरेला पिस्तूल अडकवत प्रवेश केल्याने पालिकेच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले

Security pundit from a pistol activist | पिस्तुलधारी कार्यकर्त्यामुळे सुरक्षिततेचे धिंडवडे

पिस्तुलधारी कार्यकर्त्यामुळे सुरक्षिततेचे धिंडवडे

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्ती प्रक्रियेप्रसंगी गुरुवारी (दि.३०) राजीव गांधी भवनमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या बंधूने कमरेला पिस्तूल अडकवत प्रवेश केल्याने पालिकेच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले. दरम्यान, पोलिसांनी सदर कार्यकर्त्यास ताब्यात घेत समज देऊन सोडून दिले.
मनपाच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष महासभा बोलाविण्यात आली होती. तत्पूर्वी, शिवसेना गटनेता कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर बाउन्सर, कार्यकर्ते यांची गर्दी जमा झाली. या गर्दीतच राहुल आरोटे हा कार्यकर्ता कमरेला पिस्तूल अडकवलेल्या स्थितीत निदर्शनास आला. महापालिका इमारतीत मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तसेच स्कॅनर मशीन आणि मेटल डिटेक्टरही बसविण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतानाही आरोटे यास पिस्तूलप्रकरणी विचारणा झाली नाही याउलट त्याने थेट सभागृहापर्यंत प्रवेश केला. या प्रकाराने सुरक्षेच्या त्रुटी समोर आल्या आहेत.

Web Title: Security pundit from a pistol activist