शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्स नोंदणीचा दुसरा टप्पा लवकरच

By admin | Updated: September 8, 2016 01:16 IST

महापालिका : हॉकर्स झोनचा पायलट प्रोजेक्ट राबविणार

नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा निश्चित केला असून, ९ हजार ६०० हॉकर्सची नोंदणी करण्यात आली आहे. आता उर्वरित हॉकर्सची नोंदणी करण्यासाठी सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा पुढील आठवड्यात राबविण्यात येणार असून, शहरातील मध्यवर्ती भागात पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठीही महापालिकेने तयारी सुरू केली आहे.महापालिका प्रशासनाने शहर फेरीवाला समितीच्या माध्यमातून हॉकर्स झोनचा आराखडा तयार करून तो महासभेच्या मान्यतेसाठी दोन महिन्यांपूर्वी ठेवला होता. महासभेने सूचना-दुरुस्तीसह त्याला मंजुरी दिली होती. परंतु अजूनही सदस्यांकडून सूचना केल्या जात असल्याने महासभेकडून ठराव प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. दरम्यान, प्रशासनाने शहरातील उर्वरित हॉकर्सचीही नोंदणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरविले असून, सर्व हॉकर्सची नोंदणी झाल्यानंतर त्यांची एकत्रित मतदार यादी तयार केली जाणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार शहर फेरीवाला समितीवर ८ सदस्य हे फेरीवाल्यांमधून निवडायचे आहेत. त्यासाठी फेरीवाल्यांमधूनच मतदानाने त्यांची निवड करायची आहे. यापुढे शहर फेरीवाला समितीवरील सदस्यांची संख्या ३० वरून २० वर आणण्यात आली आहे. हॉकर्स झोनचा आराखडा प्रत्यक्षात राबविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. महासभेचा ठराव प्राप्त होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रारंभी शहराच्या मध्यवर्ती भागात एका ठिकाणी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचीही तयारी महापालिकेने सुरू केली आहे. (प्रतिनिधी)