शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचे कार्यालय सील

By admin | Updated: October 27, 2016 00:26 IST

एसीबी : कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारे सानुग्रह अनुदान, बक्षीस वेतनाची रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम बँक मॅनेजरशी संगनमत करून परस्पर काढून जवळ बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात समितीच्या तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून, चारचाकी जप्त केली आहे़ दरम्यान, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय सील करण्यात आले असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़  नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़ २५) सायंकाळी साडेसहा वाजता पेठरोडवर स्विफ्ट डिझायर (एमएच १५ सीएम २१८०) कारमधून ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोकड जप्त केली होती. या प्रकरणी बाजार समितीचे कर्मचारी तथा एका संचालकांचा सचिव संशयित विजय सीताराम निकम (४२, रा़ दादोजी कोंडदेव नगर, गंगापूररोड), लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन (४७, कौशल्या निवास, पंचवटी) व लिपिक दिगंबर हिरामण चिखले (४२, रा़ जेलरोड, नाशिकरोड)  या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील रोकड व स्विफ्ट कार जप्त केली आहे़ यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ बाजार समितीचे प्रमुख्य कार्यालय सील करून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.   दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या तिघाही संशयितांची चौकशी सुरू केली असून, त्यात कर्मचाऱ्यांनी ही रोकड महागाई भत्ता व फरकाची असल्याचे सांगितले, मात्र ती कोठे नेत होते व कब्जात कशी आली याबाबत माहिती दिली नसल्याने त्यांची चौकशी सुरू आहे. बाजार समिती कर्मचाऱ्यांना वाटप केली जाणारी लाखो रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांच्या ताब्यात कशी तसेच बॅँकेतून परस्पर रक्कम कशी काढली, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. (वार्ताहर)संशयाची सुई बाजार समिती संचालकांवर? कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणारी लाखो रुपयांची रक्कम कर्मचाऱ्यांकडे संशयास्पदरीत्या मिळाल्याने बाजार समितीत उलटसुलट चर्चा आहे. कर्मचाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेली ही रक्कम ही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका बड्या संचालकाच्या सांगण्यावरूनच काढण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्या बड्या संचालकावर संशयाची सुई असल्याने या प्रकरणात संचालकांची उचलबांगडी होऊन चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे.