शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सव्वालाख विद्यार्थी

By admin | Updated: March 22, 2015 00:45 IST

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सव्वालाख विद्यार्थी

नाशिक : आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत रविवारी (दि. २२) घेण्यात येणाऱ्या पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून एक लाख २७ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहे. नाशिक जिल्ह्यात १५ तालुके व २ महानगरपालिका मिळून पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ८०३४६ व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४७५०२ असे एकूण १,२७,८४८ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीच्या व इयत्ता सातवीच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसविण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यात पूर्वमाध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा ३९६ केंद्रांवर होणार आहे. त्यासाठी ३९४ केंद्र संचालक, ३४ उपेंद्रसंचालक, ३५६६ पर्यवेक्षक, ९९९ शिपाई, असे एकूण ४९९३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४२ केंद्रावर विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, त्यासाठी २४२ केंद्र संचालक, २५ उपकेंद्रसंचालक, २०६९ पर्यवेक्षक, ५९० परिचर अशा एकूण २९२८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरावरून १५ तालुके व दोन मनपा यांच्यासाठी जिल्हा मुख्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे. पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण नियोजन केलेले असून, पालकांनी परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)