शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वैविध्यपूर्ण फराळाच्या सादरीकरणाने सखी झाल्या तृप्त

By admin | Updated: October 22, 2016 23:50 IST

बक्षिसांची लयलूट : शेफ विष्णू मनोहर यांनी दिला पारंपरिक पदार्थांना आधुनिक साज

नाशिक : तयार होत असलेले चटकदार पदार्थ, सोबतीला विनोदी शैलीत सुरू असलेले शेफ विष्णू मनोहर यांचे खुमासदार निवेदन, गृहिणींच्या शंकांचे तितक्याच तत्परतेने निरसन, गोड-तिखट गटात घेतलेल्या स्पर्धेतून बक्षिसांची लयलूट, भाग्यवंत सखींना प्राप्त झालेल्या सोन्याच्या अंगठ्या ही सारी ट्रिपल धमाका मेजवानी सखींनी अनुभवली. निमित्त होते लोकमत सखी मंच आणि फॉरच्युन विव्हो डायबेटिस केअर आॅइल प्रस्तुत ‘दिवाळी फराळ कार्यशाळे’चे. ऐश्वर्या मंगल कार्यालय, मालेगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सखींनी दिवाळी फराळाची अनोखी सफर अनुभवली.यावेळी मनोगत व्यक्त करताना शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले की, सखी मंचच्या कार्यक्रमाला आल्यावर माहेरी आल्यासारखे वाटते. या मंचच्या माध्यमातूनच माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. महिलांची स्वयंपाककलेतील रुची आणि ऊर्जा पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यानंतर मनोहर यांनी मोझेरोला स्टिक्स, पनीर जिलेबी, गव्हाचा चिवडा, आलू भुजिया, कांदा चकली, चॉकलेट करंजी असे दिवाळीचे पारंपरिक पदार्थ मात्र त्यांना आधुनिक ट्विस्ट देत तयार करून दाखविले. दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी कुकरी शो करताना घडणाऱ्या गमतीजमती, दैनंदिन स्वयंपाक सुलभ व्हावा म्हणून छोट्या-छोट्या टिप्स, पाककलेचे महत्त्व अशा अनेक विषयांवर त्यांनी सादरीकरणादरम्यान मार्गदर्शनही केले. दिवाळी फराळ स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित प्रशांत हिरे कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्रा. प्रवीण शेगावकर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी प्रशांत हिरे कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट, राम बंधू, बाफणा ज्वेलर्स यांचे विशेष सहकार्य लाभले. दिवाळी फराळ स्पर्धेतील विजेत्या सखींना फॉर्च्युन विव्हो आॅइलतर्फे गिफ्ट हॅँपर देण्यात आले. या स्पर्धेसाठी पारस सेल्स डिस्ट्रिब्युटरचे हेमंत मोदी, फॉर्च्युन आॅईलचे ए.एस.ई. दिरेंद्र प्रसाद, रामबंधू मसाल्याचे विपणन प्रमुख भानुदास गुंडकर तसेच अशोक बैरागी, मंगला बैरागी, सतीश कलंत्री, जयघोष जाधव, उर्मिला जाधव यांच्यासह सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)