शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

सेवाभाव जपणारे सरदार चौक मित्रमंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:28 IST

पंचवटी धार्मिक क्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पंचवटीला पौराणिक महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रित यावे याच हेतूने १९२५ रोजी सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव स्थापनेला सुरुवात करण्यात आली.

पंचवटी धार्मिक क्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पंचवटीला पौराणिक महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रित यावे याच हेतूने १९२५ रोजी सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव स्थापनेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळचे युवा नेतृत्व तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक सदूभाऊ भोरे, भीमाशंकर अदयप्रभू, शंकरनाना भोरे, परशराम महंकाळे, शंकरराव गुंडे आदी मंडळींनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मंडळ सुरू केले. सुरुवातीला सध्याच्या सरदार चौक पोलीस चौकीच्या जागी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सव सुरू केला. त्यावेळी लोकनाट्य, पौराणिक देखावे साकारून नागरिकांना एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न केला. मंडळाचे यंदा गणेशोत्सव स्थापनेचे ९३ वे वर्ष आहे. पंचवटी परिसराला पौराणिक महत्त्व असल्याने आतापर्यंत धार्मिक देखावे सादरीकरण केले आहे. मंडळातर्फे गणेशोत्सव व महाराष्ट्र दिन असे वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबिर राबविले जाते. याशिवाय मोफत आरोग्य तपासणी, विविध धार्मिक कार्यक्र म राबविले जातात.दरवर्षी खंबाळे येथील अनाथ बालक आश्रमातील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप केले जाते. गणेशोत्सव वर्गणीतून जमा झालेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम गणेशोत्सवाला, ३० टक्के रक्कम सामाजिक उपक्रम तर उरलेल्या रकमेतून पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून वापरली जाते.  अलीकडे (कै.) रमेशशेठ भोरे व (कै.) संजय अदयप्रभू यांनी या मंडळाचे नेतृत्व केले. सध्या मंडळाचे कामकाज मन्नासेठ अदयप्रभू, सुनील महंकाळे, राजेंद्र भोरे, राजेश भोरे, महेश महंकाळे, राजूसेठ अदयप्रभू, बंटी भोरे, रवींद्र अदयप्रभू, चिंटू भोरे, अमित भोरे, गणेश भोरे आदी बघत आहेत.