शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’ प्रकरणात छावा क्रांतिवीर सेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:26 IST

शासनाने मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था स्थापन केलेली आहे. मात्र, या संस्थेवर काही शासकीय अधिकाऱ्यांनी निर्बंध आणून ‘सारथी’च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसोबतच अन्य उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला

नाशिक : शासनाने मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था स्थापन केलेली आहे. मात्र, या संस्थेवर काही शासकीय अधिकाऱ्यांनी निर्बंध आणून ‘सारथी’च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसोबतच अन्य उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला असून, अशाप्रकारे मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी बाधक ठरणारा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी छावा क्रांतिवीर विद्यार्थी संघटनेतर्फे राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.मंत्रालयातील काही अधिकाºयांनी ‘सारथी’ या स्वायत्त संस्थेवर अंकुश ठेवताना संस्थेच्या अधिकारांना लगाम लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप छावा क्रांतिवर संघटनेने केला आहे. मराठा समाजासाठी आर्थिक व शैक्षणिक उन्नतीच्या विविध योजना राबविण्यासाठी ‘सारथी’ला कंपनी कायद्यानुसार स्वतंत्र अधिकार देण्यात आले होते. आता सारथीच्या स्वायत्ततेवर निर्बंध लादण्यात आल्याचा आरोप छावा क्रांतिवीर संघटनने केला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना सरकारी बाबूंच्या प्रवृत्तीमुळे जर बंद होणार असेल ते स्वीकारार्ह नसून मुख्यमंत्र्यांनी आपले विशेषाधिकार वापरून याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करतानाच निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष करण गायकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष माळोदे, नितीन दातीर, किरण डोके, विजय खर्जुल, नितीन पाटील, अर्जुन शिरसाठ, सागर पवार, गणेश दळवी, सागर खर्जुल,रवी भांभिरगे व पदाधिकारी उपस्थित होते.३ डिसेंबर २०१९ला इतर मागासवर्ग व भटक्या विमुक्त जाती मराठा समाजासाठीच्या सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एसइबीसी कल्याण विभागाच्या वतीने एक परिपत्रक काढले त्यानुसार सरकारच्या परवानगीशिवाय सारथीला एक रुपयाही खर्च करण्याचा अधिकार उरलेला नाही.

टॅग्स :Studentविद्यार्थीChagan Bhujbalछगन भुजबळScholarshipशिष्यवृत्ती