भरदुपारी बंगल्यातून चंदनवृक्ष केला गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:19+5:302021-01-13T04:35:19+5:30

---- पाथर्डीत अवैध दारूविक्री रोखली नाशिक : पाथर्डी गावात राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या देशी दारूची होणारी ...

Sandalwood tree disappeared from Bhardupari bungalow | भरदुपारी बंगल्यातून चंदनवृक्ष केला गायब

भरदुपारी बंगल्यातून चंदनवृक्ष केला गायब

----

पाथर्डीत अवैध दारूविक्री रोखली

नाशिक : पाथर्डी गावात राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या देशी दारूची होणारी विक्री इंदिरानगर पोलिसांनी छापा टाकून रोखली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित दिलीप शिवराम मोरे (रा.पाथर्डी गाव) यास ताब्यात घेत, त्याच्याकडून प्रिन्स संत्रा या देशी दारून ८ बाटल्या जप्त केल्या आहेत. संशयित मोरे हा या बाटल्याने चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.

---------

मल्हारखाण झोपडपट्टीत तडीपार गुंड ताब्यात

नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारास राकेश सुभाष साळुंखे (रा.मल्हारखाण) यास शहरासह जिल्ह्यातून वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले. मात्र, तो शहरा व परिसरात सर्रासपणे वावरत होता. त्यास पोलिसांनी मल्हाणखाण झोपडपट्टीतून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध तडीपार कारवाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

भारतनगरमधून तडीपार गुंडांना अटक

नाशिक : मुंबई नाका पोलिसांनी नियमितपणे राबविलेल्या गस्तीमध्ये वडाळा रोडवरील भारतनगर भागातून संशयित वसीम अब्दुल रहेमान शेख (रा. भारतनगर) या तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली आहे. वसीम याला वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले होते, तरीही तो याच परिसरात वावरत होता. त्याचप्रमाणे, संशयित सोहेल उर्फ बाबू पप्पू खान रजिउल्लाअन्सारी यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहेल यास दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असतााना, तो शहरात पोलिसांना मिळून आला.

Web Title: Sandalwood tree disappeared from Bhardupari bungalow