स्विफ्ट मोटारीतून देशी दारूची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:16 IST2021-05-07T04:16:02+5:302021-05-07T04:16:02+5:30

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गानगर येथे एका चारचाकी गाडीत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचून ...

Sales of native liquor from Swift cars | स्विफ्ट मोटारीतून देशी दारूची विक्री

स्विफ्ट मोटारीतून देशी दारूची विक्री

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गानगर येथे एका चारचाकी गाडीत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून देशी दारूच्या बाटल्यांनी भरलेले सुमारे १४ बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राकेश शेवाळे व हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कामटवाडे रोडवर दुर्गानगर येथे एक इसम अवैधरीत्या दारू विक्री करत आहे. यावरून त्यांनी व.पो.नि. कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिसरात सापळा रचून दादाजी देवराम काकुळते (४६, रा. सावतानगर, सिडको) यास ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या मालकीच्या स्विफ्ट गाडी (एमएच १५- बीएक्स -२२२०) मध्ये देशी दारूचे १४ बॉक्स व अन्य १,४५७ दारूच्या बाटल्यांचा सुमारे ३७ हजार ८८२ रुपयांचा अवैध मद्यसाठा आढळून आला. या प्रकरणी मुद्देमाल व चारचाकी वाहन जमा करण्यात येऊन अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sales of native liquor from Swift cars