शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
2
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
3
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
4
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
5
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
6
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
7
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
8
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
9
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
10
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
11
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
12
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
13
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
15
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
16
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
17
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
18
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
19
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
20
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
Daily Top 2Weekly Top 5

गलवान खोऱ्यात जवानांना वाचविताना नाशिकचे सुपुत्र सचिन मोरे यांना वीरमरण; आज अंत्यसंस्कार होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:01 IST

शनिवारी सकाळी लष्करी इतमामात मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यामुळे मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावाचे भूमिपुत्र व भारतीय सेनेच्या इंजिनिअर रेजिमेंटचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवरील गलवान खोऱ्यातील नदीत आपल्या सहकारी जवानांना वाचविताना वीरमरण आले. त्यांचे पार्थीव शनिवारी (दि.२७) सकाळी त्यांच्या मुळगावी लष्करी वाहनाने मध्यरात्री दाखल झाले. शनिवारी सकाळी लष्करी इतमामात मोरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यामुळे मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.मागील काही दिवसांपासून पुर्व लडाखमधील गलवान खो-यातील भारत-चीनच्या लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी सैन्याकडून कुरापती वाढल्याने तणाव निर्माण झाला आहे. या सीमेवर भारताच्या अद्याप वीसपेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. भारत-चीन सैन्यामधील वाढता संघर्ष लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गलवान खो-यातून वाहणा-या एका नदीवर भारतीय सैन्याची एक तुकडी पूल उभारणी करत असताना अचानकपणे नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे पुल बांधणी करत असलेले काही सैनिक नदीत वाहून जाऊ लागले ही बाब तेथे तैनात असलेले शूरवीर सचिन यांच्या लक्षात येताच प्रसंगावधान राख तत्काळ त्यांनी आपल्या जवानांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली.दरम्यान, जवानांना वाचविण्यास त्यांना यश आले असले तरी दुर्दैवाने सचिन यांच्या डोक्याला दगडचा जबर मार लागल्याने त्यांना वीरमरण आल्याची माहिती सचिन यांच्या धाकट्या बंधूंना तेथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यांच्या निधनाने साकुरी झाप गावातील मोरेवाडीसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.