शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

भगूरमध्ये डेंग्यूचे संशयित रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:48 IST

भगूर नगरपालिकेने दवाखाना बंद केल्याने परिसरात मोठ्या संख्येने डेंग्यूची लागण झालेल्या संशयित रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना शासकीय रु ग्णालय व खासगी  रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे.

भगूर : भगूर नगरपालिकेने दवाखाना बंद केल्याने परिसरात मोठ्या संख्येने डेंग्यूची लागण झालेल्या संशयितरुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना शासकीय रु ग्णालय व खासगी  रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे.अनेक अडचणींना तोड द्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. भगूर नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी भगूरमध्ये सहा महिन्यांमध्ये सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आता तीन वर्षे पूर्ण झाले तरी हॉस्पिटल नसल्याने डेंग्यूच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. भगूर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार भगूरमध्ये डेंग्यूची लागण झाली असून, केवळ दहा संशयितरु ग्ण भरती झालेले आहेत. अन्य रुग्ण जागेअभावी इतर दवाखान्यात असावेत. नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य निरीक्षक एन. के. शेख यांनी सांगितले की, भगूर नगरपालिकेतील आरोग्य विभागातील औषध फवारणी तीन मशीन असून, ते नादुरुस्त झालेले आहे. बºयाच ठिकाणी फवारणीही झालेली नाही. त्यामुळे भगूर परिसरात डेंग्यूचेरुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. भगूरमध्ये रुग्णालयाचे सुविधा नसल्याने भगूर गावातील नागरिक देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, बिटको हॉस्पिटलसह काही रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्येही मध्ये औषध उपचारासाठी दाखल झाले आहेत.देवळालीकॅम्प कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये भगूर परिसरातील डेंग्यू, मलेरिया, टायफड, उलटी, जुलाब अशा आजारांचे शंभर पेक्षा जास्त रु ग्ण जून, जुलै, आॅगस्ट महिन्यांत जास्त कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये सर्वांत जास्त भगूरचेरुग्ण आढळून आले. तसेच भगूरमधील अनेक खासगी दवाखान्यातही या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. भगूर येथील लॅब फी व तपासणी फी जास्त आकारली जाते. भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रतिभा पाटील व नगरसेवक यांचे आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष झाल्याने भगूरचे नागरिकांना डेंग्यूच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे भगूर येथील डेंग्यूचे रु ग्ण कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलला दाखल आहेत.नालेसफाईचा अभावकॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल व भगूर नगरपरिषद यांना दोन वर्षांपूर्वी पत्र देऊन सांगितले होते की, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूची लागण होती. त्यासाठी नालेसाफसफाई करावी. स्थानिक संस्थेने हे न केल्याने डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. येथील प्रशासकीय अधिकारी नगरसेवक जिल्हाधिकारी यांनी यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रतन चावला व कार्यकर्त्यांनी केली आहे.भगूर परिसरामध्ये औषध फवारणी नाही तसेच ठिकठिकाणी उगवलेले गाजर गवत, नालेसफाई नाही, ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डबके यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे डास, यामुळे डेंग्यूची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला अपयश आले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूhospitalहॉस्पिटल