शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची भूमिका अनमोल

By admin | Updated: March 12, 2017 01:12 IST

नाशिक : समाजातील प्रत्येक महान पुरुषामागे महिलांची भूमिका अनमोल आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीजन्माचे स्वागतच केले पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेविका सुषमा पगारे यांनी केले.

नाशिक : समाजातील प्रत्येक महान पुरुषामागे महिलांची भूमिका अनमोल आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीजन्माचे स्वागतच केले पाहिजे, असे प्रतिपादन नगरसेविका सुषमा पगारे यांनी केले.ग्रामीण व शहरी भागातील फुटपाथवर राहणारे व दगडखाण क्षेत्रात कष्टकरी महिलांचे सबलीकरण व विकासात्मक परिवर्तन करण्यासाठी संतुलन संस्था सतत वीस वर्ष कार्यरत आहेत. याच संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या औचित्यावर २० व्या संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेचे आयोजन येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात करण्यात आले होते. महिला परिषदेचे उद्घाटन नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार संगीता फुके यांच्या हस्ते संतुलन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. श्रद्धा ठोंबरे, महिला हक्क संरक्षण समितीच्या मीनाक्षी मराठे संतुलन संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. पल्लवी रेगे, दगडखाण कामगार परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. बी. एम. रेगे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अ‍ॅड. पल्लवी रेगे यांनी सांगितले की, समाजामध्ये स्त्रियांना समान अधिकार मिळाल्याशिवाय समाजात संतुलन येणार नाही. प्रत्येक मुलाच्या नावात आईचे नाव व प्रत्येक घर हे महिलेच्या नावावर असले पाहिजे. अध्यक्षीय भाषणात नगरसेविका सुषमा पगारे यांनी समाजातील प्रत्येक बदलात महिलांची अनमोल भूमिका असल्याचे सांगितले. यावेळी अनेक महिला बचत गटांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन मंगल कानवडे यांनी केले तर आभार रमेश सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मायाराम नवले, राजेंद्र जाधव, सविता वळवी, प्रणिता चव्हाण, देवराम पवार, चिमन वळवी, वैजयंता वाकचौरे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)