शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला दिवसा वीज मिळण्यासाठी सटाण्यात ‘प्रहार’चा रास्ता रोकोचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST

दि. १ डिसेंबरपासून शेतीसाठी विजेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र या वेळापत्रकात शेतीला आठवड्यातून दिवसा तीन ते चार ...

दि. १ डिसेंबरपासून शेतीसाठी विजेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र या वेळापत्रकात शेतीला आठवड्यातून दिवसा तीन ते चार दिवसच वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे या भागातील रब्बी हंगामातील मुख्य पीक कांदा, गहू, हरभरा आणि उसाची लागवड संकटात सापडली आहे. वास्तविक शेतीच्या कामासाठी मजूर दिवसा कामाला येतात, असे असताना वीज कंपनीकडून रात्री वीजपुरवठा केल्यामुळे पाण्याअभावी कांदा आणि ऊस लागवडीबरोबरच गहू, हरभरा पेरण्या संकटात सापडल्या आहेत. यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी येथील मोरेनगरच्या वीज कंपनीच्या कार्यालयासमोर शिर्डी-साक्री महामार्गावर ठिय्या देऊन रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रहारचे आंदोलन हाणून पाडले. दरम्यान, उपअभियंता अभिजित अहिरे यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, सुधाकर पाटील, राजू पाटील, तुषार खैरनार, कपिल सोनवणे, राजाभाऊ जगताप, दादाजी ह्याळीज, कैलास निकम, दशरथ पूरकर, भाऊसाहेब मोरे, महेंद्र खैरनार, राजेंद्र देवरे, कृष्णा जगताप, हिंमत माळी, किरण मोरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्य सरकार दिवसा शेतीला आठ तास वीज देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र तीही हवेत विरली. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या जिवाशी न खेळता दिवसा शेतीला दिवसा वीज द्यावी अन्यथा या प्रश्नी शेतकर्‍यांसाठी प्रहारच्या आंदोलनात सहभागी होऊ.

- दिलीप बोरसे, आमदार, बागलाण

===Photopath===

031220\03nsk_24_03122020_13.jpg

===Caption===

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने सटाणा येथे शिर्डी-साक्री महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा प्रयत्न करतांना कार्यकर्ते.०३ सटाणा २